शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मज्ञानी माणसानं बलात्कार केल्यास ते पाप नाही- आसाराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2018 21:35 IST

फिर्यादी पक्षाच्या साक्षीदाराकडून महत्त्वपूर्ण माहिती समोर

जोधपूर: ब्रम्हज्ञानी माणसानं मुलीचं लैंगिक शोषण केल्यास ते पाप ठरत नाही, असं स्वयंघोषित संत आसाराम बापूचं मत आहे. आसाराम बापूविरोधात खटला चालू असताना फिर्यादी पक्षाच्या साक्षीदारानं ही बाब न्यायालयाला सांगितली. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसारामला न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. आसाराम लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी औषधं घ्यायचा, अशी माहिती फिर्यादी पक्षाचा साक्षीदार राहुल साचारनं न्यायालयाला दिली. राहुल साचार आसारामचा भक्त होता. त्यानं दिलेल्या साक्षीचा उल्लेख न्यायालयाच्या ४५३ पानांच्या निकालपत्रात आहे. राहुल हा आसारामचा अतिशय जवळचा अनुयायी असल्यानं त्याला कुटियामध्ये प्रवेश दिला जायचा. त्यानं 2003 मध्ये पुष्कर (राजस्थान), भिवानी (हरयाणा) आणि अहमदाबाद (गुजरात) येथील आश्रमांमधील आसारामच्या लिला पाहिल्या होत्या. या ठिकाणी आसारामनं मुलींचं लैंगिक शोषण केलं होतं. आसारामनं 'या' कामासाठी तीन मुलींची नेमणूक केली होती. आसाराम या तीन मुलींना टॉर्चच्या मदतीनं 'सिग्नल' द्यायचा. हा सिग्नल मिळाल्यावर ठरलेल्या मुलींना आसारामच्या कुटियामध्ये आणलं जायचं. या मुलींची निवड करण्यासाठी आसाराम तीन मुलींसोबत संपूर्ण आश्रमात फिरायचा, अशी माहितीही राहुल साचारनं न्यायालयाला दिली. अहमदाबादच्या आश्रमात असताना राहुलनं एकदा आसारामच्या कुटियाची भिंत ओलांडून आत प्रवेश केला. त्यावेळी आसाराम मुलींचं शोषण करत होता. याचा जाब विचारणारं पत्र लिहून राहुलनं आचाऱ्याकडे दिलं. त्यानंतर हे पत्र आसारामनं वाचलं. मात्र त्यानं त्याकडे दुर्लक्ष केलं. ही संपूर्ण हकिकत राहुलनं न्यायालयाला सांगितली.  

टॅग्स :Asaram Bapuआसाराम बापूRapeबलात्कार