शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
3
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
4
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
5
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
6
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
8
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
9
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
10
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
11
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
12
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
13
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
14
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
15
Women violence: देशात आपल्याच घरात महिलांचा होतोय छळ, आकडे बघा काय सांगताहेत?
16
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
17
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
18
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
19
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
20
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...

वेगाने निर्णय घेतले आणि स्वप्नांचे रूपांतर वास्तवात करता आले

By admin | Updated: September 20, 2016 06:03 IST

राज्याच्या विकासाचे, जनतेच्या आकांक्षांना अनुरूप वेगाने निर्णय घेणारे लोकाभिमुख सरकार साकार करण्याचा संकल्प मनाशी केला होता

सुरेश भटेवरा,जयपूर- राजस्थानचे मुख्यमंत्रीपद दुसऱ्यांदा स्वीकारले, तेव्हा राज्याच्या विकासाचे, जनतेच्या आकांक्षांना अनुरूप वेगाने निर्णय घेणारे लोकाभिमुख सरकार साकार करण्याचा संकल्प मनाशी केला होता. सरकारच्या कारकिर्दीला ३ वर्षे पूर्ण होत असतांना यापैकी अनेक स्वप्नांचे रूपांतर वास्तवात झाले आहे. राजस्थानची जनता सरकारच्या कामकाजावर खुश आहे. राज्यात कुठेही हिंडलात, कोणाशीही बोललात तरी लगेच त्याचा प्रत्यय तुम्हाला येईल. याचे कारण साऱ्या देशात क्रांतीकारी ठरणाऱ्या अनेक योजना माझ्या सरकारने कसोशीने राबवल्या... राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत आत्मविश्वासाने सांगत होत्या. अर्ध्या तासाच्या मुलाखतीत राज्य सरकारने गेल्या तीन वर्षांत केलेल्या कामकाजाचा भलामोठा पटच त्यांनी थोडक्या शब्दांत उलगडून दाखवला. तुमच्या सरकारचा ३ वर्षांच्या कारकिर्दीचे वैशिष्ट्य काय? याचे उत्तर देताना उत्साहाने राजे म्हणाल्या, खरे तर अनेक योजनांचा उल्लेख मला करता येईल. तथापि सरकारच्या सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या योजनेबद्दल बोलायचे तर मला सर्वप्रथम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आणि राज्यातल्या महिलांच्या खऱ्या अर्थाने सशक्तिकरणास कारणीभूत ठरणाऱ्या भामाशाह योजनेचा उल्लेख करावा लागेल. देशात आधार कार्ड संकल्पनेचा जन्मही झाला नव्हता, तेव्हा २00८ साली सरकारी योजनांचे थेट लाभ पारदर्शी पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवणारी भामाशाह योजना अमलात आणण्याचे आम्ही ठरवले. राजस्थानातील प्रत्येक कुटुंबाला आधार मानून त्यांच्या आर्थिक समावेशाचे लक्ष्य पूर्ण करण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या या योजनेत, रेशन कार्ड, पेन्शन, नरेगा, उच्च व तंत्रशिक्षणाच्या शिष्यवृत्त्या यासारख्या विविध योजनांच्या लाभार्थींना सरकारने सहभागी केले. आता बँकांच्या शाखा, ई-मित्र व एटीएमखेरीज राजस्थानच्या जिल्हा, ब्लॉक व ग्रामपंचायत स्तरावर उघडलेल्या माहिती तंत्रज्ञान संपर्क केंद्रांद्वारे विविध योजनांचे लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा इरादा आहे. १५ आॅगस्ट २0१४ साली सुरू करण्यात आलेल्या भामाशाह योजनेत आजवर १00.२९ लाख कुटुंबे व ३३९.८२ लाख व्यक्तिंचा समग्र डेटाबेस सरकारने तयार केला आहे. भामाशाह कार्ड आणि बँकेची खाती लिंक करण्यात आली असून, कुटुंबाच्या खात्याचे प्रमुखपद घरातल्या महिलेकडे आहे. भामाशाह योजनेच्या एकाच कार्डावर ती तिला रेशन घेता येते, एटीएममधून पैसे काढता येता आणि विविध सरकारी योजनांचे थेट लाभही तिच्या पदरात पडतात. पॅन वा आधार कार्डासारखे हे कार्ड नसून, राज्यातल्या जनतेला विविध लाभ मिळवून देणारे चलनी नाणेच बनले आहे, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.देशातच नव्हे तर जगभर या योजनेचे यश क्रांतीकारी ठरणार आहे, असे सांगताना त्या म्हणाल्या, देशात विविध क्षेत्रांत आघाडीवर असलेल्या राज्यांच्या यादीत राजस्थानचा समावेश व्हावा, यासाठी माझ्या सरकारने अनेक लक्षवेधी उपक्रम सुरू केले आहेत. थोडक्यात त्याचा उल्लेख करणे सोपे नाही. तरीही रिसर्जंट राजस्थान समिटच्या माध्यमातून ३ लाख ३0 हजार कोटींचे करार करून जी गुंतवणूक राज्यासाठी आम्ही मिळवली. त्याचे लाभ या भूमीवर लवकरच दिसू लागतील. ‘सरकार तुमच्या दारी’ उपक्रमाद्वारे अशा दुर्गम भागांपर्यंत आम्ही पोहोचलो जिथे आजपर्यंत एकही लोकप्रतिनिधी गेला नव्हता. ‘न्याय आपल्या दारी’ कार्यक्रमाद्वारे वर्षानुवर्षे प्रलंबित महसुली प्रकरणांचे निस्तारण अल्पावधीत शक्य झाले. ‘तुमचा जिल्हा, तुमचे सरकार’द्वारे जिल्ह्यांच्या समस्यांचे वास्तव आम्ही न्याहाळले व त्यांचे अग्रक्रम बदलून आवश्यकतेनुसार जुन्या योजनांचे रूपांतर नव्या सक्षम योजनांमधे आम्ही केले. रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी स्कील डेव्हलपमेंट कार्यक्रम अत्यंत जिद्दीने राबवला जातोय. कामगारांना दिलासा देण्यासाठी श्रम कायद्यात महत्त्वाचे बदल केले. अप्रासंगिक व कालबाह्य ठरलेले २४८ कायदे आम्ही रद्द केले. ग्रामीण भागात रेशनच्या धान्याबरोबर घरगुती वापराच्या ब्रँडेड वस्तू मिळाव्यात, यासाठी सरकारने ५ हजार स्वस्त धान्य दुकानांचे रूपांतर नव्या अन्नपूर्णा भांडारात करण्याची योजना राबवली आहे. खासगी क्षेत्रात बिग बझार चालवणाऱ्या फ्युचर ग्रुपशी त्यासाठी करार केला आहे. बहुतांश गावांत २४ तास वीजपुरवठा सुरू झाला आहे. पाणी संकटाचे निवारण करण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजनांचे काम सुरू आहे, ही माहिती वसुंधरा राजे यांनी दिली.राज्य सचिवालयाच्या २१२ स्थानांखेरीज अन्य सरकारी इमारती व आमेर महल सह ३६६ ठिकाणी तसेच ब्लॉक स्तरावर २९१ ठिकाणी व्हाय फाय, हॉट स्पॉटची सुविधा दिली आहे. जिल्हा मुख्यालयात आजवर कार्यरत असलेली व्हिडिओे कॉन्फरन्सिंगची सोय आता ७५00 ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचली आहे.आमचे काम लोक पाहत आहेत. त्यांचा विकास आमच्या कारकिर्दीत वेगाने घडेल, असा विश्वास त्यांना वाटतोय, असे सांगून वसुंधरा राजे म्हणाल्या की, वेगाने निर्णय घेणारे व प्रत्यक्ष केलेले काम दाखवू शकणारे सरकार ही ख्याती माझ्या सरकारने तीन वर्षात मिळवली आहे.>२४ तास वीजपुरवठा; ५ हजार स्वस्त धान्य दुकानेरोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी स्कील डेव्हलपमेंट कार्यक्रम अत्यंत जिद्दीने राबवला जातोय. कामगारांना दिलासा देण्यासाठी श्रम कायद्यात महत्त्वाचे बदल केले. अप्रासंगिक व कालबाह्य ठरलेले २४८ कायदे आम्ही रद्द केले.ग्रामीण भागात रेशनच्या धान्याबरोबर घरगुती वापराच्या ब्रँडेड वस्तू मिळाव्यात, यासाठी सरकारने ५ हजार स्वस्त धान्य दुकानांचे रूपांतर नव्या अन्नपूर्णा भांडारात करण्याची योजना राबवली आहे.खासगी क्षेत्रात बिग बझार चालवणाऱ्या फ्युचर ग्रुपशी त्यासाठी करार केला आहे. बहुतांश गावांत २४ तास वीजपुरवठा सुरू झाला आहे. पाणी संकटाचे निवारण करण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजनांचे काम सुरू आहे, ही माहिती वसुंधरा राजे यांनी दिली.