गुवाहाटी : बलात्कार आणि धमकावल्याच्या कथित आरोपावरून आसाम पोलिसांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.नागावच्या पोलीस उपअधीक्षक सविता दास यांनी सांगितले की, पोलीस ठाण्याला मिळालेल्या तक्रारीनुसार गोहेन यांच्याविरुद्ध२ आॅगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. तथापि, त्यांनी अधिक तपशील दिला नाही. चौकशी पूर्ण झाल्यानंतर आवश्यक असेल तर त्यांना अटक केली जाईल, असे नागाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. मागच्या आठवड्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
रेल्वे राज्यमंत्र्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 04:14 IST