शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शरीरावर सोन्याची बिस्कीटे बांधून आणायची, प्रत्येक ट्रिपसाठी मिळायचे ₹13 लाख...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 21:59 IST

अभिनेत्री रन्या रावला 12.56 कोटी रुपयांच्या सोने तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Ranya Rao Smugging Case: कन्नड अभिनेत्री आणि मॉडेल रन्या राव हिला सोन्याची तस्करी करताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. तिला बंगळुरुच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) अटक केली. तपासादरम्यान अधिकाऱ्यांनी तिच्या जॅकेटमध्ये लपवलेले 14.2 किलो विदेशी सोने जप्त केले, ज्याचे अंदाजे बाजार मूल्य 12.56 कोटी रुपये आहे. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी नागावरा येथील डीआरआय कार्यालयात नेण्यात आले.

प्रत्येक ट्रिपमधून लाखोंची कमाईमिळालेल्या माहितीनुसार, रन्या राव ही कर्नाटक पोलीस दलामधील डीजीपी रामचंद्र राव यांची कन्या असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. दरम्यान, रन्या रावने गेल्या वर्षी दुबईला 30 वेळा प्रवास केल्याचाही तपासात खुलासा झाला आहे. प्रत्येकवेळी तिने काही किलो सोने लपवून भारतात आणले आणि प्रत्येक किलोसाठी तिला 1 लाख मिळाल्याची माहितीही समोर आली आहे. म्हणजेच, प्रत्येक ट्रिपमधून रन्या 12 ते 13 लाख रुपये कमावयची. 

15 दिवसांत 4 वेळा दुबई ट्रिपतीन महिन्यांपूर्वी रन्याचे भव्य लग्न झाले. तिने प्रसिद्ध आर्किटेक्ट जितीन हुक्केरी यांच्याशी लग्न केले आहे. विशेष म्हणझे, त्यांचा कोणताही व्यवसाय नसताना ती गेल्या 15 दिवसांत 4 वेळा दुबईला गेली. नुकताच त्यांनी एक आलिशान फ्लॅट खरेदी केला, ज्यामुळे त्यांच्या जीवनशैलीवर प्रश्न उपस्थित झाले होते. यामागे तस्करीचे मोठे नेटवर्क आहे का, याचा तपास संबंधित अधिकारी करत आहेत.

विमानतळावरी कॉन्स्टेबलची मदतबंगळुरू विमानतळावर तैनात कॉन्स्टेबल बसवराजने रन्याला मदत केल्याचे तपासात समोर आले आहे. त्याने रन्याला पळून जाण्यात मदत केली, पण डीआरआय टीम तिच्यावर आधीच लक्ष ठेवून होती, त्यामुळे रन्याला रंगेहात पकडले. रन्या एक उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. तपास अधिकारीदेखील विविध अँगलने या घटनेचा तपास करत आहेत. 

रन्याच्या घरातून कोट्यवदीची जप्तीरन्याच्या अटकेनंतर अधिकाऱ्यांनी 4 मार्च रोजी तिच्या घरावर छापा टाकला. येथून 2.67 कोटी रुपयांची रोकड आणि 2.06 कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. या छाप्यात तीन मोठे खोकेही जप्त करण्यात आले असून, एकूण जप्तीची किंमत 17.29 कोटी रुपये झाली आहे. 1962 च्या सीमाशुल्क कायद्यांतर्गत रन्या रावला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

टॅग्स :Smugglingतस्करीGoldसोनंDubaiदुबई