शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातील 75 पैकी 25 वाघ बेपत्ता; शोध सुरू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 19:59 IST

Ranthambore National Park :इतक्या मोठ्या संख्येने बाघ बेपत्ता होण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे.

Ranthambore National Park : राजस्थानच्या सवाई माधोपूर येथील वाघांसाठी प्रसिद्ध असलेले रणथंबोर राष्ट्रीय उद्यान सध्या चर्चेत आले आहे. रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातून वर्षभरात 75 पैकी 25 वाघ बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता वाघांचा शोध घेण्यासाठी तीन सदस्यीय तपास पथक तयार करण्यात आले आहे. तपास पथक या प्रकरणाचा अहवाल दोन महिन्यांत मुख्य वन्यजीव वॉर्डन कार्यालयाला सादर करणार आहे.

विशेष म्हणजे, एका वर्षात एवढ्या मोठ्या संख्येने वाघ बेपत्ता झाल्याचा अधिकृत अहवाल येण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी, जानेवारी 2019 ते जानेवारी 2022 दरम्यान रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातून 13 वाघ बेपत्ता झाले होते.

रणथंबोरमधून वर्षभरात 25 वाघ बेपत्ता झाल्याच्या वृत्ताने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. वाघ बेपत्ता झाल्याची बातमी विभागीय व्याघ्र निरीक्षण अहवालातूनन समोर आली आहे. याप्रकरणी प्रधान मुख्य वनसंरक्षक पी.के. उपाध्याय यांनी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली असून, ही चौकशी समिती रणथंबोरमधून बेपत्ता झालेल्या वाघांचा अहवाल दोन महिन्यांत सादर करणार आहे.

चौकशी समितीची स्थापनापवनकुमार उपाध्याय यांनी चौकशी समिती स्थापन केली आहे. यात अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक टी मोहनराज जयपूर आणि मानस सिंग यांची चौकशी समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही चौकशी समिती वाघ बेपत्ता झाल्यानंतर शोधण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची चौकशी करेल. यासोबतच कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा निष्काळजीपणा आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. रणथंबोरच्या व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी ही समिती आपल्या सूचनाही देईल.

देखरेख नीट होत नव्हतीरणथंबोरमधून वाघ बेपत्ता होत असल्याने तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. तज्ज्ञांच्या मते, वाघांची संख्या वाढत आहे, वाघांना प्रदेशासाठी पुरेशी जागा मिळत नाही, त्यामुळे वाघांमध्ये परस्पर संघर्ष वाढत असून, कमजोर वाघ रणथंबोरमधून बाहेर पडत आहेत. तसेच, अनेक वेळा शक्तिशाली वाघाशी संघर्ष होऊन दुर्बल वाघाचा मृत्यूही होतो. विभागीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अनेक वेळा मृत वाघांचा शोध लागत नाही आणि विभाग वाघ बेपत्ता झाल्याचे मानतो. रणथंबोरमधील अधिकारी व्याघ्र संवर्धनापेक्षा पर्यटनावर भर देतात, असे वन्यजीव तज्ज्ञ आणि वन्यजीवप्रेमी सांगतात. 

टॅग्स :TigerवाघRajasthanराजस्थान