शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

झोपडीतला तरुण ‘आयआयएम’चा प्राध्यापक!, केरळातील मराठी आदिवासी युवकाची गरुडझेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 07:03 IST

‘IIM’ professor : मराठी भाषक अनुसूचित जमातीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रामचंद्रन यांची भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम), रांची येथे सहायक प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली आहे.

नवी दिल्ली : शिक्षण माणसाचे आयुष्य बदलून टाकत असते. त्याला रंकाचा रावही करते शिक्षण. अनेकांनी आपल्या शिक्षणाच्या बळावर आपल्या आयुष्याचे चित्र बदलवून टाकल्याची अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला सापडत असतात. असेच एक उदाहरण आहे रणजीत रामचंद्रन (वय २८) यांचे. ते केरळमधील कासारगोड येथे राहतात. मराठी भाषक अनुसूचित जमातीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रामचंद्रन यांची भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम), रांची येथे सहायक प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली आहे.घरात अत्यंत हलाखीची परिस्थिती. वडिलांचा कपडे शिवण्याचा व्यवसाय तर आई रोजगार हमी योजनेवर काम करणारी. भावंडांमध्ये रणजीत सर्वात मोठे. सर्व कुटुंब एका लहानशा झोपडीत राहत होते. अशा परिस्थितीतही त्यांनी शिक्षणाची आस सोडली नाही. भावंडांच्या शिक्षणासाठी त्यांनी बीएसएनएल टेलिफोन एक्सचेंजमध्ये नाइट गार्डची नोकरी केली. नंतर ते आयआयटी मद्रासला गेले. कासारगोडच्या बाहेर कधीही न गेलेल्या माझ्यासारख्याला इंग्रजीही धड बोलता येत नव्हते. परंतु परिस्थितीने सर्व शिकवले, असे रणजीत विनयाने नमूद करतात. रणजीत यांनी अर्थशास्त्रात पीएच.डी. पूर्ण केले असून गेल्या सोमवारी त्यांची आयआयएम, रांची येथे सहायक प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. तत्पूर्वी ते बंगळुरू येथील एका विद्यापीठात कार्यरत होते.

यशस्वी होण्यासाठी संघर्ष करणाऱ्या तरुणांना माझ्यामुळे कदाचित प्रेरणा मिळू शकेल. एका क्षणी तर पुढील शिक्षण सोडून कुटुंबासाठी नोकरी करण्याचे मी ठरविले होते. परंतु परिस्थिती बदलवली, याचे समाधान वाटते.     - रणजीत रामचंद्रन 

टॅग्स :KeralaकेरळProfessorप्राध्यापक