शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
2
मुंबई मेट्रो- १ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड, वर्सोवाकडे जाणारी वाहतूक रखडली, प्रवाशांचे हाल
3
इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हैफा बंदराचं मोठं नुकसान? अदानी समुहानं दिली अशी माहिती   
4
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
5
इराणने थेट अमेरिकन दूतावासावर डागली मिसाइल्स, इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये घबराट
6
'अनेक वेळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
7
G20 च्या पडद्यामागील हिरो अमिताभ कांत यांचा राजीनामा! ४५ वर्षांच्या सेवेला का दिली पूर्ण विराम?
8
संजय कपूर यांचा शेवटचा फोटो समोर, कॅप्टनसोबत हसताना दिसले; पोलो खेळतानाच गेला जीव
9
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
10
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
11
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
12
Monsoon Picnic: सध्या पावसाळी सहलीला जाताना जरा सांभाळूनच; वाचा 'ही' मार्मिक कथा!
13
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
14
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
15
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
16
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
17
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
18
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
19
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
20
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?

रस्त्यावर रंगला अपहरणाचा थरार, पोलिसांनीही फिल्मी स्टाइलने केली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 07:30 IST

टोळी युद्धातून प्रतिस्पर्धी ‘चॉकलेट’चे अपहरण : पोलिसांनीही फिल्मी स्टाइलने केली सुटका

मनीषा म्हात्रेमुंबई : पोलिसांनी तडीपार केलेल्या आरोपीला आपल्या प्रेयसीला भेटण्याचा मोह जिवावर बेतला असता. मात्र, केवळ नशीब बलवत्तर म्हणून पोलीस वेळेवर पोहोचले आणि या आरोपी तरुणाचा जीव वाचला. रविवारी रात्री मुंबईतील अँटॉप हिल ते घोडपदेव या रस्त्यावर माफिया टोळीने प्रतिस्पर्धी चॉकलेट नावाने प्रसिद्ध असलेल्या सिद्धार्थ भोसले नावाच्या तरुणाच्या केलेल्या या अपहरणाचा थरार घडला. पोलिसांनीही फिल्मी स्टाइलने जिवाची बाजी लावून अपहरण झालेल्या तरुणाची सुखरूप सुटका केली. सध्या त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अँटॉप हिल परिसरात राहणारा सिद्धेश भोसले हा पोलीस अभिलेखवरील गुन्हेगार आहे. पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याला तडीपार केले आहे. रविवारी काळोख पडताच त्याने प्रेयसीला भेटण्यासाठी मुंबईत प्रवेश केला. तो प्रेयसीला माटुंगा परिसरात भेटायला आला. नेमक्या त्याच क्षणी माटुंगाच्या लक्ष्मी नापू रोड येथील बुलेट इमारतीजवळ वाहनातून आलेल्या चौकडीने त्याला अडवून मारहाण सुरू केली. दुसरीकडे प्रेयसी मदतीसाठी याचना करीत होती. यावेळी तेथून जाणाऱ्या दोन पोलिसांनी त्याला वाहनात ढकलत असल्याचे पाहून त्यांच्याकडे धाव घेतली; पण तोपर्यंत ते तेथून निघून गेले. पोलीस उपायुक्त वियज पाटील यांनी तत्काळ शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, माटुंगा, सायन, तसेच अँटॉप हिल पोलीस ठाण्यातील विविध पथकांनी शोध सुरू केला. 

प्रेयसीच्या चौकशीतून तो आरोपी चॉकलेट असल्याचे समजताच पोलिसांनी त्याच्या विरोधकांची माहिती घेण्यास सुरुवात केली. माटुंगा पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी संदीप अहीरराव, भरत गुरव यांना सीसीटीव्हीच्या मदतीने त्याचे अपहरण केलेले वाहन वडाळा टी टीच्या दिशेने जाताना दिसले.दुसरीकडे, अँटॉप हिल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नासीर कुलकर्णी यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक नितीन झाडे, सहायक फौजदार बबन जाधव आणि अंमलदारांनी त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासत, खबऱ्यामार्फत शोध सुरू केला. त्यातून त्यास घोडपदेव येथील एका सिमेंटच्या गोदामात नेल्याचे समजले. दोन ते अडीच तासांच्या शोध मोहिमेनंतर एका गोदामात त्याला मारहाण करताना चौकडी दिसली. यावेळी पोलिसांसोबत त्यांची झटापट झाली. मात्र, पोलिसांनी जिवाची बाजी लावत अर्धमेला झालेल्या भोसलेची सुटका करीत प्रफुल्ल पाटकरला अटक केली, तर तिघे जण पसार झाले. 

मुंबईतल्या नामांकित महाविद्यालयात एकत्र शिक्षण घेत असताना जखमी तरुण आणि आरोपीमध्ये घट्ट मैत्री होती. मात्र, यातच एकाच्या बहिणीसोबत अश्लील कृत्य केल्याच्या घटनेनंतर त्यांच्यात दोन गट पडले. एक गट काळाचौकी आणि दुसरा अँटॉप हिलमधील आहे. 

दीड वर्षापासून वाद सुरू झाला. गेल्या वर्षी मे महिन्यात भोसलेचा मित्र हितेश नागडे तरुणावर नागेश चव्हाण, विजय काकडे, मंदार रांजनकर, प्रफुुुल्ल पाटकर टोळीने हल्ला चढवला. यामध्ये त्याची ३ बोटे तुटली. यामध्ये पाटकर आणि रांजनकर नुकतेच जामिनावर बाहेर आले. 

मात्र, काकडे आणि चव्हाण यांना जामीन मिळत नसल्याने त्यांच्या वादात भर पडली. घटनेच्या आदल्या दिवशीही त्यांच्यात वाद झाला. मात्र, ते प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले नाही. यातूनच त्यांनी हल्ला चढवला.  

टॅग्स :KidnappingअपहरणMumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारी