शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पतीला झाडाला बांधून पत्नीबरोबर आळीपाळीनं सामूहिक बलात्कार, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 13:50 IST

महिला सुरक्षा आणि सशक्तीकरणाचा कितीही दावा केला तरी परिस्थिती काहीशी वेगळी आहे.

लखनऊः महिला सुरक्षा आणि सशक्तीकरणाचा कितीही दावा केला तरी परिस्थिती काहीशी वेगळी आहे. उत्तर प्रदेशात महिलेवर सामूहिक बलात्काराचा आणखी एक घृणास्पद प्रकार समोर आला आहे. रामपूरमध्ये एक दाम्पत्य मोटारसायकलवरून जात होते. रस्त्यामध्ये काही तरुणांनी त्यांना अडवलं आणि महिलेबरोबर छेडछाड सुरू केली. तिच्या पतीनं त्या तरुणांना विरोध केल्यानंतर त्या गुंडांनी पतीलाच मारहाण केली. तसेच पतीसमोरच पत्नीवर आळीपाळीनं बलात्कार केला. त्या नराधम तरुणांनी मारहाणीचा एक व्हिडीओ बनवला असून, तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडित पती-पत्नीनं त्या आरोपी गुंडांविरोधात पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. रामपूरच्या पटवाई क्षेत्रात राहणारं दाम्पत्य बाइकवरून औषधं आणण्यासाठी 11 जून रोजी जात होते. त्याचदरम्यान चार तरुणांनी त्यांना घेरलं आणि त्यांची बाइक थांबवून छेडछाड सुरू केली. त्या पती-पत्नीनं त्याला विरोध केल्यानंतर त्या नराधम तरुणांनी पतीला मारहाण केली, तर पत्नीवर सामूहिक बलात्कार केला. त्या तरुणांनी मारहाणीचा एक व्हिडीओसुद्धा बनवला आहे.आरोपींनी पतीला झाडाला बांधून पत्नीबरोबर आळीपाळीनं सामूहिक बलात्कार केला आहे. या प्रकरणात तीन आरोपींची ओळख पटली असून, कलम 376डी, 323, 504, 66E अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींना पकडण्यासाठी चार टीम बनवण्यात आल्या असून, लवकरच सर्व आरोपींना जेलमध्ये पाठवलं जाणार आहे. 

टॅग्स :Molestationविनयभंग