शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

रामनाथ कोविंदांचे पारडे जड

By admin | Published: July 17, 2017 8:43 PM

भारताच्या १४ व्या राष्ट्रपतीपदासाठी सोमवारी संसद भवनात मतदान झाले. एनडीए उमेदवार रामनाथ कोविंद आणि युपीएच्या उमेदवार मीराकुमार यांच्यात सरळ लढत आहे.

सुरेश भटेवरानवी दिल्ली, दि. 17 : भारताच्या १४ व्या राष्ट्रपतीपदासाठी सोमवारी संसद भवनात मतदान झाले. एनडीए उमेदवार रामनाथ कोविंद आणि युपीएच्या उमेदवार मीराकुमार यांच्यात सरळ लढत आहे. उद्या दिल्लीत तमाम राज्यातल्या मतपेट्यांचे आगमन होईल व निवडणुकीची मतमोजणी २0 जुलैला संपन्न होईल. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा कार्यकाल २४ जुलै रोजी संपतो आहे. त्यापूर्वी २0 जुलै रोजीच नवनिर्वाचित राष्ट्रपतींचे नाव जाहीर होईल. एकुण मतदानापैकी एनडीएकडे ६३ टक्के मतांचे पाठबळ असल्याने रामनाथ कोविंद यांचा विजय निश्चित असल्याचे मानले जात आहे.संसद भवनात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे मतदान शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. पंतप्रधान मोदी संसद भवनात मतदानासाठी वेळेपूर्वीच उपस्थित होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह गुजराथ विधानसभेत अहमदाबादच्या नारणपुरा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनीही संसद भवनात मतदान केले. या केंद्रावर मतदान करणाऱ्यांमधे प्रामुख्याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, बसपच्या प्रमुख मायावती आदींचा समावेश होता. खासदार अभिनेता परेश रावल व हेमामालिनी यांनीही संसद भवनात मतदान केले. मतदान केंद्रावर खासदारांसाठी हिरव्या रंगाच्या तर आमदारांसाठी गुलाबी रंगाच्या मतपत्रिका होत्या.

आणखी वाचा 
 
देशाचे १४ वे राष्ट्रपती निवडण्यासाठी दिवसभर देशाच्या ३१ विधानसभांमधे मतदान झाले. हाती आलेल्या माहितीनुसार त्रिपुरा, उत्तरप्रदेश व गुजराथमधे क्रॉस व्होटिंग झाले. त्रिपुरात पक्षाचा आदेश झुगारून तृणमूलच्या ६ व काँग्रेसच्या १ बंडखोराने रामनाथ कोविंद यांना मतदान केल्याचे समजते. उत्तरप्रदेशात मुलायमसिंगांचे बंधू शिवपाल यादव यांच्या दाव्यानुसार समाजवादी पक्षातल्या सुमारे १0 आमदारांनी कोविंद यांना मतदान केले तर गुजराथमधे भाजपचे बंडखोर आमदार नलिन कोटडिया यांनी मीराकुमारांना मतदान केल्याचे समजले. देशात राजस्थान एकमेव असे राज्य आहे, जिथे ३ तास अगोदर मतदान समाप्त झाले. महाराष्ट्रात २ तर झारखंडात ४ आमदारांना तुरूंगातून मतदानासाठी आणले गेले. राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकण्यासाठी एकुण मतदानाच्या ५0 टक्यांहून अधिक मते हवीत. एनडीएकडे स्वत:चे ४८ टक्के मतदान आहे. याखेरीज ६ विरोधी पक्षांसह ज्या १६ पक्षांनी एनडीए उमेदवार कोविंद यांना पाठिंबा दिला, त्यांचे मतदान १५ टक्के आहे. अशाप्रकारे रामनाथ कोविंद यांच्याकडे ६३ टक्के मतदानाचे पाठबळ असल्याने, त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.