शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

रामनाथ कोविंद देशाच्या राष्ट्रपतिपदी विराजमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 17:41 IST

देशाचे 14 वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये शपथ घेतली

नवी दिल्ली, दि. 25 - देशाचे 14 वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये शपथ घेतली. आज दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी त्यांनी राष्ट्रपतिपदाची शपथ घेतली. भारताचे सरन्यायाधिश न्या. जगदीश सिंग केहार यांनी कोविंद यांना  पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधी सोहळ्यात देशाचे जवळपास सर्वच दिग्गज नेते,राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.    राष्ट्रपतिपदाची शपथ घेण्यापूर्वी कोविंद राजघाट येथे पोहोचले, तेथे यांनी त्यांच्या पूर्वसुरींप्रमाणे शपथविधीच्या आधी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीवर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर यांनी राष्ट्रपती भवनाच्या लायब्ररीमध्ये मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली.  शपथविधीचा छोटेखानी औपचारिक सोहळा संसद भवनाच्या मध्यवर्ती दालनात झाला. सरन्यायाधीश न्या. जगदीश सिंग केहार कोविंद यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राष्ट्रपती हे प्रजासत्ताकाचे राष्ट्रप्रमुख असल्याने त्यांच्या पदग्रहणास उपराष्ट्रपती, पंतप्रधानांसह सर्व केंद्रीय मंत्री, तिन्ही सेनादलांचे प्रमुख, सर्व घटकराज्यांचे राज्यपाल व मुख्यमंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि शंभरहून अधिक देशांचे भारतातील राजदूत व उच्चायुक्त उपस्थित होते. रिवाजानुसार राष्ट्रपतींचे लष्करी सचिव कोविंद यांना राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणापर्यंत घेऊन गेले. तेथे मावळते राष्ट्रपती मुखर्जी यांनी उत्तराधिकाऱ्यांचं स्वागत केलं. त्यानंतर माजी आणि भावी असे दोन्ही राष्ट्रपती एकाच मोटारीत बसले व मोटारींचा ताफा दोघांनाही संसद भवनात घेऊन आला.

संसद भवनाच्या प्रवेशद्वारी लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन व राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती हमीद अन्सारी कोविंद यांचे स्वागत करून शपथविधीसाठी त्यांना केंद्रीय सभागृहात घेऊन गेले.  पदग्रहणानंतर राष्ट्रपतींच्या अंगरक्षक दलाची तुकडी नव्या राष्ट्रप्रमुखांच्या मोटारीच्या अग्रभागी राहून त्यांना राष्ट्रपती भवनापर्यंत नेण्यात आलं. येतानाही कोविंद व मुखर्जी एकाच मोटारीने परत येतील, मात्र यावेळी त्यांच्या जागा बदललेल्या असतील.

राष्ट्रपती भवनात आल्यावर मुखर्जी कोविंद यांना सोबत घेऊन ‘ग्रहप्रवेश’ करतील व नव्या राष्ट्रपतींना भवनाची सैर करत त्यांना राष्ट्रपतींचे कार्यालय असलेल्या अभ्यासिक दालनात घेऊन येतील. तेथे मुखर्जी यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्यास राष्ट्रपतींच्या आसनावर आदरपूर्वक बसविले की नव्या राष्ट्रपतींच्या पदग्रहणाचा औपचारिक समारोप होईल. निवृत्तीनंतर प्रणव मुखर्जी यांचे वास्तव्य १०, राजाजी मार्ग या बंगल्यात असेल. पदग्रहणानंतर कोविंद मुखर्जी यांना त्यांच्या नव्या घरी सोडून परत राष्ट्रपती भवनात येतील.

ज्योतिषांनी ठरविला रामनाथ कोविंद यांच्या शपथविधीचा मुहूर्त- राजकारण्यांच्या जीवनात ज्योतिषांची भूमिका महत्वाची असते हे तसे सर्वज्ञात आहे. राष्ट्रपतींच्या सोहळ्यासाठी २५ जुलै रोजी हा दिवस नक्की असतो. पण यंदा ज्योतिषाच्या सांगण्यावरून राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

मागच्या दोन दशकात शपथविधी सकाळी १० ते १२ च्या दरम्यानच झालेला आहे. पण, यंदा नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी १२.१५ वाजता शपथ घेण्याचे ठरविले आहे. शपथविधी सोहळा मंगळवारी सकाळी १०.१५ वाजता होणार असल्याचे आधी सांगण्यात आले होते. पण, कदाचित ज्योतिषांच्या सल्ल्यावरुन शपथविधीची वेळ बदलण्यात आली आहे. अभिजित नक्षत्र १२.१४ नंतर सुरू होते. सर्वात शुभ वेळ १२.१५ ची असेल. भाजपचे ज्येष्ठ खासदार प्रभात झा यांच्या म्हणण्यानुसार, ही सर्वात शुभ वेळ आहे. भगवान राम अभिजित नक्षत्रावर जन्मले होते.