शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गरज पडल्यास भाजपाचं सरकार स्थापण्यासाठी मायावतींशी चर्चा करण्यास तयार - रामदास आठवले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 13:02 IST

मायावती आणि अखिलेश यादव यांच्या आघाडीमुळे भाजपासह त्यांचे इतर मित्रपक्षही चिंतेत दिसत आहेत

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 25 वर्षांपासून एकमेकांच्या विरोधात असलेले समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी गोरखपूर आणि फुलपूर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी एकत्र आले. मायावती आणि अखिलेश यादव यांच्या आघाडीमुळे भाजपासह त्यांचे इतर मित्रपक्षही चिंतेत दिसत आहेत. अशातच, गरज पडल्यास भाजपाची सत्ता आणण्यासाठी मायावती यांच्यासोबत बोलणी करण्यास तयार आहे, असे केंद्र सरकारमधील मंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटले आहे. जर केंद्रात सरकार स्थापन करायचं असेल तर उत्तर प्रदेशात सर्वाधिक जागा मिळवणं आवश्यक आहे.

2014 लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला 80 पैकी 71 जागांवर विजय मिळला होता. मात्र, सपा आणि बसपा यांनी हातमिळवणी केल्यानं उत्तर प्रदेशातील मतांचं गणित बदललं आहे आणि दोन्ही पार्टीची व्होटबँक भाजपावर भारी होताना दिसत आहे. सपा-बसपा एकत्र आल्याचे परिणाम गोरखपूर आणि फुलपूर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत पाहायलाही मिळाले. दरम्यान, सपा-बसपाची आघाडी अतुट असून 2019पर्यंत कायम राहणार असल्याची घोषणा खुद्द मायावती यांनी केली आहे. मात्र, सपा-बसपाची आघाडी होऊ नये, यासाठी भाजपा प्रयत्नशील असल्याचं दिसत आहे. मात्र, या प्रयत्नात भाजपाला म्हणावे तसं यश येताना दिसत नाहीय.  भाजपाच्या पराभवासाठी आघाडी आवश्यकगोरखपूर, फुलपूर, अरारिया, जेहानाबाद येथील पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाल्याने विरोधी पक्षांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. अखिलेश यादव, मायावती, तेजस्वी यादव, मिसा भारती, ममता बॅनर्जी, दोन्ही डावे पक्ष तसेच काँग्रेसचे नेते यांनी एकत्र येणे गरजेचे असल्याची भावना पुन्हा व्यक्त केली आहे. 14 मार्चला निकाल लागण्याच्या चोवीस तास आधी सोनिया गांधी यांच्या घरी आयोजिलेल्या मेजवानीत 19 पक्ष सहभागी झाले होते. उत्तर प्रदेशमध्ये बसपा व सपा एकत्र आल्यानंतर लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये जे निकाल लागले ते पाहता सारे विरोधक एकत्र आल्यास मोदी सरकारचा विजयरथ रोखता येईल, असा आत्मविश्वास त्यांच्यात आला आहे.फुलपूर व गोरखपूर येथील लोकसभा पोटनिवडणुकांत काँग्रेस पराभूत झाली असली तरी या पराजयातही काँग्रेसचा एकप्रकारे विजयच झाला आहे. या दोन्ही मतदारसंघात सपा-बसपाच्या आघाडीच्या उमेदवारांविरोधात काँग्रेसने आपले उमेदवार विचारपूर्वक मैदानात उतरविले होते. भाजपा उमेदवाराची मते काँग्रेसच्या उमेदवाराने काही प्रमाणात घेतल्याने त्याचा अप्रत्यक्ष फायदा सपा-बसपाला मिळाला.

केंद्रात सत्तेत असलेला पक्ष पोटनिवडणुकांत शक्यतो जिंकतो. पण 2016-17 या काळातील पोटनिवडणुकांत भाजपा पराभूतच होत आला आहे. अमृतसर, श्रीनगर, गुरुदासपूर, अजमेर, अलवर, फुलपूर, गोरखपूर, अरारिया येथे झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकांचे निकाल हेच सांगतात. सपा व बसपाचा 2014च्या सार्वत्रिक निवडणुकीत दारुण पराभव झाला होता. पण फुलपूर, गोरखपूर पोटनिवडणुकांच्या निकालांनी विरोधी पक्षांमध्ये नवे बळ संचारले आहे.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेmayawatiमायावतीAkhilesh Yadavअखिलेश यादवBJPभाजपा