खुल्या जागेच्या लिलावास तात्पुरती स्थगिती रमाकांत डाके : लिलावादरम्यान नागरिकांचा गोंधळ
By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST
सांगोला :
खुल्या जागेच्या लिलावास तात्पुरती स्थगिती रमाकांत डाके : लिलावादरम्यान नागरिकांचा गोंधळ
सांगोला : शहरातील तहसील कार्यालयाशेजारी असलेल्या 41 खुल्या जागेवरील लिलावाच्या अनुषंगाने व्यापार्यांसोबत आलेल्या इतर नागरिकांनी लिलावादरम्यान गोंधळ घालून व्यत्यय आणला. व्यापार्यांव्यतिरिक्त नागरिकांनी गोंधळ केला म्हणून खुल्या जागेच्या लिलावास तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.सांगोला शहरातील अंबिकादेवी मंदिर व तहसील कार्यालयाशेजारी असलेल्या नगरपालिका हद्दीतील 41 खुल्या जागेच्या लिलावासंदर्भात शुक्रवार, दि़ 13 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहात लिलाव काढण्याबाबत व्यापार्यांची बैठक झाली. यावेळी 106 व्यापार्यांनी 41 खुल्या जागा मिळण्याबाबत नगरपरिषदेकडे अर्ज केला होता. अनामत रकमा भरलेल्या व्यापार्यांव्यतिरिक्त इतर नागरिकांनी सभागृहाबाहेर जाण्याच्या सूचना मुख्याधिकार्यांनी दिल्या होत्या. मात्र इतर नागरिकांनीच व्यापार्यांना सभागृहातून बाहेर काढल्यामुळे लिलावाची बोली बोलण्यासाठी व्यापारीच थांबले नाहीत. पर्यायाने शुक्रवारी होणारे खुल्या जागेचे लिलाव तात्पुरते स्थगित करत असल्याचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले. पुन्हा लिलाव काढावेतइतर नागरिकांच्या गोंधळामुळे व्यापार्यांना जागा मिळविण्यासाठी आता प्रतीक्षा करावी लागणार आहे. शिवाय जागेअभावी छोटे-मोठे व्यवसाय बंद असल्याने त्यांचा दैनंदिन उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नगरपरिषद प्रशासनाने रद्द झालेले खुल्या जागेचे लिलाव लवकरात लवकर काढावेत, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.