शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
2
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
3
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
4
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
5
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
6
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
7
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
8
केजरीवाल जेलमधूनच बघणार लोकसभा निकाल, अंतरिम जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाकडून ५ जूनपर्यंत राखून
9
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
10
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
11
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
12
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
13
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
14
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
15
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
16
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
17
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
18
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
19
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
20
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!

सीतेचे अपहरण म्हणे रामाने केले, गुजरातच्या पुस्तकात उलटे रामायण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 5:24 AM

सीतेला रावणाने पळवून लंकेत नेले, असे आतापर्यंत सर्वांना शिकवण्यात आले

अहमदाबाद : सीतेला रावणाने पळवून लंकेत नेले, असे आतापर्यंत सर्वांना शिकवण्यात आले. पण गुजरातमधील १२ वीच्या संस्कृतच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मात्र सीतेला रावणाने नव्हे, तर चक्क रामानेच पळवले होते. त्यांना संस्कृतचे जे पुस्तक आहे, त्यातच तसे छापले आहे.हा प्रकार उघडीस आल्यानंतर आपणास याची माहिती नाही, माहिती मिळवून सांगतो, असे गुजरात पाठ्यपुस्तक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष नितीन पेठाणी यांनी सांगितले. नंतर मात्र त्यांनी चूक मान्य करताना भाषांतर करणाऱ्याकडून ती झाली असल्याची सारवासारव केली. रावणाच्या जागी चुकून राम असे छापले गेले असून, ते दुरुस्त करू, असे ते म्हणाले. 'इंट्रोडक्शन टू संस्कृत लिटरेचर' या पुस्तकाच्या १0६ क्रमांकाच्या पानावर ही चूक आहे. त्या पानावर सीतेच्या अपहरणाचा उल्लेख असून, ते अपहरण रामाने केले, असे छापले आहे.सीतेचा जन्म टेस्ट ट्यूब बेबीमुळेचरामायणाच्या काळापासून भारतात टेस्ट ट्यूब बेबीचा प्रकार होता. रामाची पत्नी सीता हिचे पृथ्वीतून जन्म घेणे हा टेस्ट ट्यूब बेबीचाच प्रकार आहे, असे विधान उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी केले आहे. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी महाभारताच्या काळात पत्रकारितेचा जन्म झाला, कुरूक्षेत्रावरील घडामोडीची इत्थंभूत माहिती संजयने एकाच जागी बसून धृतराष्ट्रांना देणे ही पत्रकारिता होती, असा अजब दावा केला होता. याबाबतभाजपाचे सरचिटणीस भूपेंद्र यादव यांनी दिनेश शर्मा यांना फोन करून चांगलेच झापले आहे. यामुळे हिंदूंच्या मतांवर परिणाम होऊ शकतो याची समज दिली आहे.नारद मुनी म्हणजे गूगलच!गूगलचा जन्म तर आता झाला आहे. पण नारद मुनींकडे जगातील प्रत्येक गोष्टींची माहिती असायची. आजच्या भाषेत सांगायचे, तर ते स्वत:च गूगल होते.  दिनेश शर्मा यांनी प्लॅस्टिक सर्जरी व मोतीबिंदूची शस्त्रक्रिया प्राचीन काळापासून भारतात होत आल्याचेही विधान उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांनी केले. यापूर्वी त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांनी महाभारताच्या काळात इंटरनेट व सॅटेलाइट हे प्रकार होते, असे म्हटले होते.