शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तिकीट काढा... राम मंदिर १ जानेवारीपर्यंत पूर्ण होणार, गृहमंत्री अमित शहा म्हणाले, तारीख सांगत नाही म्हणता? घ्या तारीख! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 12:03 IST

अयोध्येतील बहुप्रतीक्षित राम मंदिर पूर्णत्वाची तारीख केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी जाहीर केली.

सबरूम (त्रिपुरा) : अयोध्येतील बहुप्रतीक्षित राम मंदिर पूर्णत्वाची तारीख केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी जाहीर केली. पुढच्या वर्षी १ जानेवारीपर्यंत रामलल्लाचे भव्य मंदिर बांधून पूर्ण होईल, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी देशभरात पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात झालेल्या विविध धार्मिक स्थळांच्या कॉरिडॉरची माहितीही दिली.

जाहीर सभेत शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. ‘२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आपण भाजपचे अध्यक्ष होतो, तर राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते रोज विचारायचे, मंदिर तिथेच बांधणार; पण तारीख  सांगत नाहीत... तर नोंद घ्या, १ जानेवारी २०२४ ला तुम्हाला अयोध्येत गगनचुंबी राम मंदिर तयार झालेले दिसेल,’ असे ते म्हणाले.

केवळ राम मंदिरच नाही...‘केवळ राम मंदिरच नाही, तर एक-दोन वर्षे जाऊ द्या, माँ त्रिपुरा सुंदरीचे मंदिरही इतके भव्य बांधले जाईल की संपूर्ण जग ते बघायला येईल. काशी विश्वनाथ, महाकालचा कॉरिडॉर बनविला. सोमनाथ आणि अंबाजीचे मंदिर सोन्याचे बनविले जात आहे. माँ विंध्यवासीनीचे मंदिर नवीन बांधले जात आहे,’ असेही ते म्हणाले.

शहा यांनी दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यातील सबरूम येथे, तसेच उत्तर त्रिपुरा जिल्ह्यातील धर्मनगर येथे रथयात्रेला हिरवा झेंडा दाखविला होता. या वर्षाच्या सुरुवातीला राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्य सरकारची कामगिरी जनतेला सांगणे हा या यात्रेचा उद्देश आहे.

काँग्रेस आणि माकपने राम मंदिराचा मुद्दा बराच काळ न्यायालयाच्या अखत्यारीत ठेवला होता. तर या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराची पायाभरणी केली होती. आता त्रिपुरावासीयांनी अयोध्येचे तिकीट काढून ठेवावे.     - अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAmit Shahअमित शाह