शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

तुरुंगात राम रहीमला हनीप्रीतच्या हातून हवा मसाज! कोर्टात केली होती याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 20:20 IST

बलात्काराच्या प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा झालेला गुरमीत राम रहीम सध्या हनीप्रीत इन्सानच्या आठवणीने व्याकुळ झाला आहे.

ठळक मुद्दे राम रहीम आणि हनीप्रीतमध्ये लैंगिक संबंध असल्याचा आरोप केला होता. सध्या हरयाणा पोलिसांनी हनीप्रीत इन्सान विरुद्ध लूकआऊट नोटीस जारी केली आहे.

पंचकुला, दि. 2 - बलात्काराच्या प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा झालेला गुरमीत राम रहीम सध्या हनीप्रीत इन्सानच्या आठवणीने व्याकुळ झाला आहे. तुरुंगात हनीप्रीतला सोबत ठेवण्याची परवानगी मिळावी यासाठी त्याने याचिकाही केली होती. पण सीबीआय कोर्टाने त्याची याचिका फेटाळून लावली. हनीप्रीत गुरमीत राम रहीमची दत्तक मुलगी आहे. या दोघांमध्ये वडील आणि मुलीचे नाते असले तरी, त्यांच्या संबंधांबद्दल उलट सुलट चर्चा सुरु आहेत. 

हनीप्रीतपासून विभक्त झालेल्या तिच्या नव-याने मागच्या आठवडयात राम रहीम आणि हनीप्रीतमध्ये लैंगिक संबंध असल्याचा आरोप केला होता. हनीप्रीत राम रहीमची मदतनीस असण्याबरोबरच त्याची फिजियोथेरपीस्ट तसेच त्याला मसाजही करायची. सध्या हरयाणा पोलिसांनी हनीप्रीत इन्सान विरुद्ध लूकआऊट नोटीस जारी केली आहे. राम रहीमला कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर त्याला पळवण्याचा कट रचला होता. त्यात हनीप्रीत सहभागी असल्याचा आरोप आहे. 

डे-यातील दोन साध्वींवरील बलात्कार प्रकरणात राम रहीमला सीबीआय कोर्टाने 20 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या निकालानंतर हनीप्रीतला राम रहीमसोबत पळून जायचे होते. न्यायालयाच्या निकालानंतर वडील आणि मुलीने एकत्र राहण्याची परवानगी मिळावी यासाठी याचिका केली होती. हनीप्रीतने तिच्या वकिलाकरवी तर राम रहिमने स्वतंत्र याचिका दाखल केली होती. पण कोर्टाने दोघांची याचिका फेटाळून लावली.

तुरुंगात वेगळे ठेवलेराम रहीम याला इतर कैद्यांपासून वेगळे ठेवण्यात आलेले आहे. राम रहीम याला दोषी ठरविण्यात आल्यानंतर, त्याच्या पाठीराख्यांनी जो हिंसाचार केला, त्यामुळे तुरुंगातील कैदी संतापलेले आहेत. माहिती राम रहीम याच्यासोबत एकाच खोलीत असलेल्या व शुक्रवारी जामिनावर सुटलेल्या कैद्याने दिली आहे. बाबाच्या पाठीराख्यांनी केलेल्या हिंसाचारामुळे अनेक जणांचा मृत्यू झाल्यामुळे कैदी संतापलेले आहेत.राम रहीम याला वेगळे ठेवले गेले नसते, तर कैद्यांनी त्याच्यावर हल्ला केला असता, असे तो कैदी म्हणाला. तो राम रहीमबरोबर सोनारिया (तुरुंगात पाच दिवस एकत्र होता.

राम रहीमचे फोटो नाल्यात राजस्थानच्या श्रीगंगानगर शहरातील तुंबलेल्या काही नाल्यांची पाहणी केली असता, त्यात राम रहीम याचे शेकडो फोटो आढळले. मीरा चौक आणि सुखाडिया सर्कलमधील नाले या फोटोंमुळे तुंबले होते. त्यात १०० पेक्षा जास्त फोटो व राम रहीमची भित्तिपत्रके टाकून दिली होती. हे फोटो आणि भित्तिपत्रके बाबाच्या अनुयायांनी टाकल्याचा अंदाज आहे.

टॅग्स :Gurmeet Ram Rahimगुरमीत राम रहीम