शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा पण संत रामपालची मुक्तता, सुटका होऊनही जेलमध्येच ठेवण्यात येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 17:33 IST

हत्याकांडातील आरोपी असलेल्या आणि सतलोक आश्रमाचा प्रमुख स्वयंघोषित संत बाबा रामपालची हिस्सार न्यायालयाने मुक्तता केली आहे

हिस्सार (हरियाणा), दि. 29 - हत्याकांडातील आरोपी असलेल्या आणि सतलोक आश्रमाचा प्रमुख स्वयंघोषित संत बाबा रामपालची हिस्सार न्यायालयाने मुक्तता केली आहे. मुक्तता करण्यात आली असली तरी त्याला जेलमध्येच राहावं लागणार आहे. कारण त्याची फक्त दोन खटल्यातून मुक्तता करण्यात आली आहे. रामपालवर सरकारी कार्यात अडथळे आणि आश्रमात महिलांना जबरदस्तीने बंधक केल्याचा आरोप होता. या दोन आरोपांमधून त्याची मुक्तता झाली आहे. मात्र त्याच्यावर देशद्रोह आणि हत्येचा खटला सुरु राहणार आहे. त्यामुळे त्याला कारागृहातच ठेवण्यात येणार आहे. हा सत्याचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया संत रामपालचा वकील एपी सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

हिस्सार न्यायालय 24 ऑगस्ट रोजी निकाल देणार होतं, मात्र डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याच्यावरील सुनावणी असल्याने हा निकाल पुढे ढकलण्यात आला होता. रामपालविरोधात देशद्रोहासह अनेक गुन्हे दाखल असून तो सध्या हिस्सारच्या सेंट्रल जेल-2 मध्ये कैदेत आहे.

हिस्सारमध्ये रामपालच्या सतलोक आश्रमात नरबळी गेल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं रामपालच्या अटकेचा आदेश दिला होता. मात्र रामपालला आश्रमात घुसून अटक करायला समर्थकांनी पहिल्यांदा जोरदार विरोध केला. त्यानंतर पोलीस आणि समर्थकांमध्येही धुमश्चक्री झाली. यामध्ये अनेक निष्पापांचे बळी गेले. अखेर पोलिसांनी बाबा रामपालला नोव्हेंबर 2014 मध्ये अटक केली होती. यावेळी बाबा रामपालच्या समर्थकांनी थेट पोलिसांवरच गोळीबार केला होता.

त्याआधी स्वयंघोषित संत बाबा रामपालला २००६ मधील हत्याप्रकरणात हरियाणा पोलिसांनी अटक केली होती. तब्बल दोन आठवड्यांचे अथक प्रयत्न व हिंसक आंदोलनानंतर पोलिसांना रामपालला अटक करण्यात यश आले होते. मात्र 2008 मध्ये त्याला जामीन मिळाला होता. पोलिसांनी त्यावेळी अटकेसाठी आलेल्या खर्चाचा सखोल तपशील कोर्टासमोर सादर केला होता. यामध्ये रामपालचा ठावठिकाणा शोधणे व त्यांच्या अटकेसाठी हरियाणाने १५ कोटी ४३ लाख, पंजाबने ४ कोटी ३४ लाख, चंदीगड प्रशासनाने ३ कोटी २९ लाख आणि केंद्र सरकारने ३ कोटी ५५ लाख रुपये खर्च केले.  या स्वयंघोषित संताच्या अटकेसाठी ऐवढा खर्च झाल्याने संताप व्यक्त होत होता.   

 

टॅग्स :Courtन्यायालय