शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

राम रहीम, आसारामसह १४ बाबा आहेत ‘भोंदू’!, राधे माँचाही समावेश, आखाडा परिषदेने जाहीर केली यादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 05:31 IST

स्वयंभू बाबांमुळे अलीकडच्या काळात समोर आलेल्या काही प्रकरणांनंतर हिंदू साधूंची सर्वोच्च संस्था अखिल भारतीय आखाडा परिषदेने रविवारी १४ भोंदू बाबांची नावे जाहीर केली आहेत. या यादीत बलात्कार प्रकरणी तुरुंगात असलेले राम रहीम, आसाराम बापू यांच्यासह राधे माँचाही समावेश आहे.

अलाहाबाद : स्वयंभू बाबांमुळे अलीकडच्या काळात समोर आलेल्या काही प्रकरणांनंतर हिंदू साधूंची सर्वोच्च संस्था अखिल भारतीय आखाडा परिषदेने रविवारी १४ भोंदू बाबांची नावे जाहीर केली आहेत. या यादीत बलात्कार प्रकरणी तुरुंगात असलेले राम रहीम, आसाराम बापू यांच्यासह राधे माँचाही समावेश आहे.अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत १३ आखाड्यांचे प्रमुख उपस्थित होते. भोंदू बाबांची यादी जाहीर करताना महंत नरेंद्रगिरी म्हणाले की, आम्ही सामान्य नागरिकांना आवाहन करत आहोत की, अशा ढोंगी लोकांपासून सावध राहावे. अशा व्यक्ती कोणत्याही संपद्रायाच्या नाहीत. आपल्या कृत्यांमुळे साधू-संतांना कलंकित करण्याचे काम ते करत आहेत.नरेंद्रगिरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आम्ही ही यादी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि विरोधी पक्षांना सोपवून या भोंदू बाबांवर कारवाईची मागणी करणार आहोत. (वृत्तसंस्था)कोण आहेत नकली बाबा?राम रहीम, आसाराम बापू, नारायण साई, रामपाल, निर्मल बाबा उर्फ निर्मलजीत सिंह,राधे माँ, सच्चिदानंद गिरी उर्फ सचिन दत्ता, स्वामी असीमानंद, ओम बाबा उर्फ विवेकानंद झा, इच्छाधारी भीमानंद उर्फ शिवमूर्ती द्विवेदी, ओम नम: शिवाय बाबा, आचार्य कुशमुनी, बृहस्तपती गिरी आणि मखलान सिंह यांची नकली बाबांच्या यादीत नावे आहेत.आमचे बाबा यादीत नको; महंतांना धमकीनकली बाबांच्या यादीत जर आमच्या बाबांचे नाव आले तर तुम्हाला ठार मारू, अशा धमकीचा फोन आपल्याला आल्याचे महंत नरेंद्र गिरी यांनी सांगितले. धमकी देणारा स्वत:ला आसाराम यांचा अनुयायी सांगत होता. नरेंद्रगिरी यांच्या तक्रारीवरून अलाहाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लोकांनी नकली बाबांपासून सावध राहावे. साधू व संत संन्यासी परंपरा, नाथ परंपरा, वैष्णव परंपरा, शैव संप्रदाय आदींमधून येतात, तर नकली बाबांचा संप्रदाय किंवा परंपरा नसते. - महंत नरेंद्रगिरी, अध्यक्ष, आखाडा परिषद‘संत’पदाची पद्धत ठरविणार‘संत’पद बहाल करण्याची निश्चित पद्धत ठरविण्यात येणार असल्याचे आखाडा परिषदेने ठरविले आहे. एखाद्या व्यक्तीची पूर्ण पडताळणी करूनच हे पद बहाल करण्यात येणार आहे. या व्यक्तीची जीवनशैली आणि संपूर्ण माहिती एकत्रित केली जाणार आहे. एका संताजवळ कोणतीही नगदी किंवा अन्य संपत्ती असायला नको. ही संपत्ती ट्रस्टची असायला हवी. त्याचा उपयोग जनकल्याणासाठी व्हायला हवा.

टॅग्स :Baba Ram Rahimबाबा राम रहीमIndiaभारत