शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Ram Mandir: जगभरातील 155 नद्यांचे पाणी अयोध्येत दाखल; 23 एप्रिल रोजी रामललाचा जलाभिषेक सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 14:28 IST

Ayodhya Temple: दिल्लीचे भाजप नेते आणि माजी आमदार विजय जॉली यांनी हे पाणी गोळा करण्याचे काम केले आहे.

Ram Mandir Ayodhya: अयोध्येतील भगवान रामाच्या भव्य मंदिराचे काम प्रगतीपथावर आहे. पुढील वर्षी हे मंदिर बांधून पूर्ण होणार आहे. दरम्यान, येत्या 23 एप्रिल रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते रामललाचा जलाभिषेक होणार आहे. यासाठी पाकिस्तान, चीन आणि उझबेकिस्तानसह अनेक देशांतील 155 नद्यांचे पाणी अयोध्येत आणले गेले आहे. दिल्लीचे भाजप नेते आणि माजी आमदार विजय जॉली यांनी हे पाणी गोळा करण्याचे काम केले आहे. 

अयोध्येत रामललाचा जलाभिषेक विजय जॉली म्हणाले की, नायजेरिया, टांझानिया, फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, भूतान, नेपाळ, बांगलादेश, मालदीव आदी देशांतून नदीचे पाणी आणले आहे. एवढंच नाही तर रामललाच्या अभिषेकासाठी अंटार्क्टिकाचे पाणीही अयोध्येत पोहोचले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 23 एप्रिल रोजी अयोध्येतील मणिराम दास छावणी सभागृहात जल कलशाची पूजा करतील. 

पाकिस्तानातून पाणी कसे आणले?उल्लेखनीय बाब म्हणजे, जगभरातील देशांमधून आणलेल्या 155 नद्यांच्या पाण्यावर त्या-त्या देशांचे झेंडे, त्यांची नावे आणि नद्यांची नावे असलेले स्टिकर्स आहेत. अयोध्येत होणाऱ्या या कार्यक्रमात विविध देशांचे राजदूतही सहभागी होणार आहेत. रामललाच्या जलाभिषेकासाठी पाकिस्तानातूनही नदीचे पाणी आणण्यात आले आहे. पाकिस्तानातील हिंदूंनी आधी दुबईला पाणी पाठवले आणि नंतर दुबईहून ते दिल्लीत आणले. यानंतर विजय जॉली यांनी हे पाणी अयोध्येत आणले. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याyogi adityanathयोगी आदित्यनाथ