शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Ayodhya Ram Mandir : राम कृपेनं शिवसेना-भाजपातील मतभेद दूर होतील - सुधीर मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 15:47 IST

Ayodhya Ram Mandir : प्रभू राम कृपेने भाजपा-शिवसेनेतील मतभेद दूर होतील,अशी प्रतिक्रिया राज्याचे अर्थमंत्री आणि भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

ठळक मुद्दे'जेवढ्या लवकर मंदिर बांधता येईल ही आंतरिक तीव्र भावना''राम मंदिर व्हावं ही प्रत्येक हिंदूंची इच्छा''राम मंदिर हा राजकारणाचा नाही तर राष्ट्रकारणाचा मुद्दा'

मुंबई - प्रभू राम कृपेने भाजपा-शिवसेनेतील मतभेद दूर होतील,अशी प्रतिक्रिया राज्याचे अर्थमंत्री आणि भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना मुनगंटीवार यांनी हे विधान केले आहे. प्रभू रामाचं मंदिर होण्यासाठी आमच्यातील छोट्या-मोठ्या गोष्ट असतील तर दूर होतील. शिवाय, युती होण्याचा मार्ग स्टेट हायवे होता आता तो राष्ट्रीय महामार्ग होईल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

पुढे ते असेही म्हणाले की, राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दाच असू शकत नाही. श्री राम मंदिर हा मुद्दा मतांसाठी नाही, ते राष्ट्रीयत्व आहे. कोट्यवधी हिंदूंची ती आस्था आहे. राम मंदिर निर्माणावरुन दोन्ही पक्षांमध्ये स्पर्धा, कुरघोडी असूच शकत नाही. कारण दोन्ही पक्षांमध्ये वैचारिक समानता आहे.  

राम मंदिर निर्माणासाठी उद्धव ठाकरे अयोध्येला गेले असतील तर यामध्ये गैर काहीच नाही. राम मंदिर व्हावं ही देशातील प्रत्येक हिंदूंच्या मनातील भावना आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा ज्या गोष्टीसाठी आग्रही आहेत, त्या गोष्टीसाठी उद्धव ठाकरेदेखील आग्रही आहेत,असंही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, 'आधी मंदिर, नंतर सरकार', उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेबाबत विचारलं असता मुनगंटीवार म्हणाले की,  निवडणुका घेऊ नये किंवा शिवसेना-भाजपाने एकत्र येऊ नये,असा उद्धव ठाकरेंचा विचार नसावा, असा दावा त्यांनी केला. शिवाय, राम मंदिर हा राजकारणाचा नाही तर राष्ट्रकारणाचा मुद्दा आहे. मंदिर हा एका पक्षाचा विषय नाहीच. तर यासाठी सर्वपक्षीयांची बैठक घेऊन एकमत केलं पाहिजे, अशीही इच्छा त्यांनी बोलून दाखवली. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे