शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

'मी देव-अल्लाची शपथ घेऊन सांगते...', श्रीराम प्राणप्रतिष्ठेवरुन ममता बॅनर्जींचा भाजपवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 16:50 IST

'मी कधीही हिंदू-मुस्लिम भेदभाव होऊ देणार नाही. धार्मिक आधारावर लोकांमध्ये फूट पाडण्यावर माझा विश्वास नाही.'

Ram Mandir Pran Pratishtha: सध्या देशभरात श्रीराम मंदिराचीच चर्चा सुरू आहे. यावरुन तृणमूल काँग्रेस (TMC) च्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मंगळवारी (9 जानेवारी) भाजपवर जोरदार हल्ला चढवला. लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिराचे उद्घाटन करून भाजप नाटक करत आहे, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली.

ममता बॅनर्जी बंगालच्या जयनगरमध्ये म्हणाल्या की, "मला राम मंदिराबद्दल विचारण्यात आले होते. मी सर्वांना एकत्र आणणाऱ्या उत्सवावर विश्वास ठेवते. भाजपवाले फक्त नाटक करत आहेत. निवडणुकीपूर्वी तुम्हाला जे हवे ते करा, मला काही अडचण नाही. पण इतर समाजाच्या लोकांची उपेक्षा करणे योग्य नाही. मी देवाची, अल्लाहची शपथ घेऊन सांगते, मी जिवंत असेपर्यंत हिंदू आणि मुस्लिमांमध्ये भेदभाव होऊ देणार नाही. धार्मिक आधारावर लोकांमध्ये फूट पाडण्यावर माझा विश्वास नाही."

TMC काय म्हणाली?22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यासाठी ममता बॅनर्जी यांना निमंत्रित करण्यात आले आहे, परंतु त्या या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे वृत्तसंस्थेने सांगितले होते. पीटीआयशी बोलताना टीएमसीच्या एका वरिष्ठ नेत्यानेही सांगितले होते की, “ममता बॅनर्जी किंवा टीएमसीच्या इतर कोणत्याही प्रतिनिधीने अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. धर्मात राजकारण मिसळण्यावर आमचा विश्वास नाही."

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा