शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
3
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
4
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
5
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
6
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
7
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
8
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
9
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
10
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
11
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
12
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
13
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
14
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
15
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
16
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
17
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
18
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
19
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
20
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी

अयोध्येतील राममंदिर २०२३ ला दर्शनास खुले, संपूर्ण मंदिर परिसर २०२५ पर्यंत तयार होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 08:39 IST

Ram Mandir in Ayodhya: अयोध्येतील राममंदिर २०२३ पर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुले होण्याची शक्यता आहे, अशी माहिती राम मंदिर ट्रस्टमधील सूत्रांनी दिली. संपूर्ण मंदिर परिसर २०२५ पर्यंत तयार होणार आहे.

नवी दिल्ली : अयोध्येतील राममंदिर २०२३ पर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुले होण्याची शक्यता आहे, अशी माहिती राम मंदिर ट्रस्टमधील सूत्रांनी दिली. संपूर्ण मंदिर परिसर २०२५ पर्यंत तयार होणार आहे.मुख्य मंदिर तीनमजली असेल व त्यात पाच मंडप असतील. मंदिराची लांबी ३६० फूट, रुंदी २३५ फूट व प्रत्येक मजला २० फूट उंचीचा असेल. मंदिराचे काम ठरविल्यानुसार होत असून, २०२३ अखेरपर्यंत भाविक मंदिरात रामलल्लाचे दर्शन घेऊ शकतील. मंदिर उभारणीचा काळ राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा मानला जात आहे. कारण पुढील लोकसभा निवडणुका २०२४ च्या पूर्वार्धात होत आहेत. नियोजनानुसार हे काम झाले, तर देशातील सत्तारूढ भाजपला निवडणुकीपूर्वी प्रचाराचा आणखी एक मुद्दा मिळणार आहे.सूत्रांनी सांगितले की, मंदिरात जमिनीवर १६० खांब, पहिल्या मजल्यावर १३२ खांब व दुसऱ्या मजल्यावर ७४ खांब असतील. मंदिराच्या गर्भगृहावर होणाऱ्या शिखराची उंची जमिनीवरून १६१ फूट असेल. यासाठी राजस्थानहून आणलेले विशेष दगड व संगमरवराचा वापर करण्यात येणार आहे.सूत्रांनी सांगितले की, तीन दशकांत झालेले बदल व लोकांच्या अपेक्षेनुसार बदल करून मंदिराच्या आराखड्याला अंतिम रूप दिलेले आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरIndiaभारत