शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

प्रभू श्रीरामाच्या प्रतिष्ठापणेसाठी कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही; कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 14:40 IST

येत्या 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्रीरामाची प्रतिष्ठापणा होणार आहे.

अयोध्या: अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या प्रतिष्ठापणेची जय्यत तयारी सुरू आहे. येत्या 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन होत आहे. तत्पुर्वी या कार्यक्रमाबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातील विविध राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केले जाणार नाही. याचे कारणही समोर आले आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रामललाच्या प्राण प्रतिष्ठेसाठी मोठ्या संख्येने भाविक अयोध्येला पोहोचण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी संबंधित प्रोटोकॉलचे पालन करणे शक्य होणार नाही. सुरक्षेच्या कारणास्तव देशभरातील राज्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. यजमान राज्य असल्याने, केवळ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ आणि राज्यपाल प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होतील.

ही आहे प्राण प्रतिष्ठेची वेळअवघ्या 1 मिनिट 24 सेकंदात रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. काशीच्या पंडितांनी हा शुभ मुहूर्त निश्चित केला आहे. द्रविड बंधू पंडित गणेशवर शास्त्री द्रविड आणि पंडित विश्वेश्वर शास्त्री यांनी सांगितले की, 22 जानेवारी रोजी मूल मुहूर्त दुपारी 12:29 वाजून 8 सेकंदापासून सुरू होईल, जो 12:30 मिनिटे 32 सेकंदांपर्यंत चालेल. म्हणजे प्राणप्रतिष्ठेसाठी एकूण वेळ फक्त 1 मिनिट 24 सेकंद असेल. या मुहूर्ताचे शुद्धीकरणही केले जाणार आहे. हे काशीतील विद्वान पंडितांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

अनेक मान्यवरांची उपस्थितीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्टेची जय्यत तयारी सुरू आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लोकांना निमंत्रण पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण 7 हजार लोकांना निमंत्रण पाठवले जाणार असून त्यापैकी 3 हजार व्हीव्हीआयपी असतील. पीएम मोदी, सीएम योगी आदित्यनाथ, आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यासह ३ हजार व्हीव्हीआयपींना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. या यादीत क्रिकेटर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, अभिनेता अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, कंगना रणौत यांचीही नावे आहेत. याशिवाय देशभरातून 4000 संतांना पाचारण करण्यात येत आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याChief Ministerमुख्यमंत्रीNarendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथ