शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोव्यात रालोआचे राहिले नाही अस्तित्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 06:42 IST

भाजप उत्तराखंडमध्ये आपल्या मित्र पक्षांवर अवलंबून नाही. गोव्यात खरी निवडणूक ही निकाल जाहीर झाल्यावर सत्तेसाठी होणारी फाटाफूट आणि होणाऱ्या पक्ष त्यागानंतर असल्याचे त्याला चांगले माहीत आहे

व्यंकटेश केसरनवी दिल्ली : भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) पंजाबमध्ये संयुक्तिक असली, तरी उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गोव्यात ती अप्रासंगिक ठरत आहे. या चारही राज्यांत पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होत आहे.पंजाबमध्ये माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा पंजाब लोक काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दलाचे (संयुक्त) नेते सुखदेव सिंग धिंडसा यांच्यासोबत जागा वाटपाची घोषणा करताना भाजपने ही आघाडी आमच्या नेतृत्वाखाली असल्याचे स्पष्ट केले होते. पंजाबमध्ये भाजप ६५ जागा लढवत आहे, तर पंजाब लोक काँग्रेस ३५ आणि धिंडसा यांचा पक्ष १५ जागा लढवत आहे. पंजाबमध्ये भाजप हा अकाली दलाचा कनिष्ठ भागीदार होता; परंतु आता तो स्वत:ला वरिष्ठ सहकारी असल्याचे दाखवत आहे. राज्यात रालोआने आपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा समोर आणलेला नाही.

भाजप उत्तराखंडमध्ये आपल्या मित्र पक्षांवर अवलंबून नाही. गोव्यात खरी निवडणूक ही निकाल जाहीर झाल्यावर सत्तेसाठी होणारी फाटाफूट आणि होणाऱ्या पक्ष त्यागानंतर असल्याचे त्याला चांगले माहीत आहे. उत्तर प्रदेशचा विचार केला तर भाजपने विधानसभा आणि लोकसभा निवडणूक जिंकली ती रालोआच्या प्रयोगामुळे नव्हे, तर धार्मिक ध्रुवीकरण आणि जातींचे जुळवलेले गणित यामुळे.बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दलाचे (संयुक्त) नेते नितीश कुमार यांना आपल्या पक्षाचा विस्तार शेजारच्या उत्तर प्रदेशमध्ये करण्याची इच्छा आहे ती निवडणुकीच्या आधी भाजपशी युती करून. परंतु, चतुर भाजपने उत्तर प्रदेशमध्ये मंडलवादी पक्षाला जागा देणे म्हणजे स्वत:ला दुबळे करून घेणे होय याची जाणीव झाल्यावर त्यांना नकार दिला. 

भाजपने रालोआच्या झेंड्याखाली हिमाचल प्रदेश, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि दिल्ली विधानसभा निवडणूक कधीही लढवलेली नाही; परंतु झारखंड, तामिळनाडूत रालोआच्या नावाखाली निवडणूक लढला आहे.

‘आप’ उमेदवाराचा आत्महत्येचा प्रयत्न    मुझफ्फरपूर : मिरणपूर विधानसभा मतदारसंघातील ‘आप’चे उमेदवार जाेगिंदरसिंग उमेदवारी अर्ज बाद झाल्यामुळे निराशेच्या भावनेतून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.     त्यांनी राॅकेल ओतून स्वत:ला पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच पाेलिसांनी त्यांना राेखले. उमेदवारी अर्ज भरताना झालेली चूक दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली नाही, असा आराेप सिंग यांनी केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीElectionनिवडणूकUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२