शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

रक्षाबंधनानिमित्त काँग्रेसकडून खास 'टोमॅटो राखी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 09:20 IST

रविवारी लखनऊ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टोमॅटो राखी बनवून ती बाजारात विक्रीसाठी ठेवली होती

ठळक मुद्दे रविवारी लखनऊ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टोमॅटो राखी बनवून ती बाजारात विक्रीसाठी ठेवली होतीयाद्वारे टोमॅटोच्या वाढलेल्या दरावरून सरकारचा निषेध करण्यात आला. काँग्रेसचे राज्य सचिव शैलेंद्र तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली ही टोमॅटो राखीची संकल्पना राबविली गेली.

लखनऊ,दि.7- वाढत्या टोमॅटोच्या दरांमुळे सर्वसामान्यांच्या ताटातून टोमॅटो गायब झाला आहे. टोमॅटोच्या वाढत्या दराचा अगदी सगळीकडूनच निषेध केला जातो आहे. काँग्रेस पक्षाकडून विविध युक्त्याकरून टोमॅटोच्या वाढलेल्या दराचा निषेध केला जातो आहे. रविवारी लखनऊ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टोमॅटो राखी बनवून ती बाजारात विक्रीसाठी ठेवली होती. याद्वारे टोमॅटोच्या वाढलेल्या दरावरून सरकारचा निषेध करण्यात आला. याआधी लखनऊ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टोमॅटो बँक सुरू केली होती. तसंच विधानसभेच्या बाहरे दहा रूपये किलो दराने टोमॅटो विकले होते. द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे. काँग्रेसचे राज्य सचिव शैलेंद्र तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली ही टोमॅटो राखीची संकल्पना राबविली गेली. लखनऊच्या कुर्सी रोडवरील गुलाचीन मंदीराच्याबाजूल्या असणाऱ्या दुकांनामध्ये या अनोख्या राख्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या. काँग्रेसकडून बनविण्यात आलेल्या या राख्या विकत घेण्यासाठी लोकांनीही गर्दी केली होती. 'टोमॅटोच्या दरांबद्दल राज्य आणि केंद्र सरकार पूर्णपणे उदासीन आहे. त्याचाच निषेध करण्यासाठी आम्ही ही पद्धत सुरू केल्याचं, शैलेंद्र तिवारी म्हणाले आहेत. 

काँग्रेसने सुरू केली 'स्टेट बँक ऑफ टोमॅटो'सर्वसामान्य लोकांना मदत करण्यासाठी तसंच शेतकऱ्यांच्या मालाला संरक्षण देण्यासाठी लखनऊ काँग्रेसने 'टोमॅटो बँक' सुरू केली. टोमॅटोच्या वाढलेल्या किंमतीवरून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करत लखनऊ काँग्रेसने शहरात 'स्टेट बँक ऑफ टोमॅटो' ही बँक सुरू केली. एखाद्या बँकेमध्ये जशा सुविधा मिळतात तशाच सुविधा या बँकेतही ग्राहकांसाठी सुविधा होत्या. फक्त या बँकेत कोणतीही गोष्ट टोमॅटोशी निगडीत असावी लागणार. या बँकेत ग्राहकांना टोमॅटोवर फिक्स डीपॉझिट करण्याची सोय देण्यात आली होती. तसंच लॉकर आणि कर्जसुद्धा टोमॅटोवर मिळण्याची सुविधा होती. काँग्रेसकडून सुरू करण्यात आलेल्या या बँकेला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळला. बँकेच्या बाहेर लोकांच्या लांब रांगा लावल्या होत्या. घरातून टोमॅटो चोरीला जातील या भीतीने लोक त्यांच्या टोमॅटो बँकेत डिपॉझिट करण्यासाठी येत होते. या रांगेमध्ये एक 103 वर्षांचा वृद्ध व्यक्तीही होता. टोमॅटो बँकेत डिपॉझिट करावे लागण्याची वेळ येऊ शकते असं कधीही वाटलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. मी अर्धा किलो टोमॅटो आता बँकेत डिपॉझिट केले आहेत. बँकेच्या नियमानुसार मला सहा महिन्यांनी एक किलो टोमॅटो मिळणार आहेत, असं त्या वृद्ध व्यक्तीने सांगितलं.