शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

"मला अटक करा किंवा खेळाडूंना सोडा...", कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ राकेश टिकैत दिल्ली बॉर्डरवर ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 20:09 IST

शेतकरी नेते राकेश टिकैत हे देखील कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ पुढे आल्याचे वृत्त आहे. राकेश टिकैत दिल्ली बॉर्डरवर ठाम आहेत.

जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलंनाविरोधात पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरहून नवीन संसद भवनाकडे कूच करणाऱ्या कुस्तीपटूंना ताब्यात घेतले. तसेच, जंतरमंतरवरील कुस्तीपटूंचा तंबूही हटवला. दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंवर केलेल्या कारवाईनंतर राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. राहुल गांधी, प्रियांका, मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विट करून कुस्तीपटूंना पाठिंबा दिला आहे, तसेच पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला आहे. 

याचबरोबर, शेतकरी नेते राकेश टिकैत हे देखील कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ पुढे आल्याचे वृत्त आहे. राकेश टिकैत दिल्ली बॉर्डरवर ठाम आहेत. राकेश टिकैत म्हणाले की, आधी खेळाडूंची सुटका होईल, त्यानंतर सीमाभागातून निरोप घेतला जाईल. खेळाडूंना आधी सोडावे अन्यथा आम्हालाही अटक करावी. दरम्यान, राकेश टिकैत आपल्या समर्थकांसह दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण पोलीस त्यांना रोखत आहेत.

दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात महिनाभरापासून आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर कारवाई करताना दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. जंतरमंतरवरील कुस्तीपटूंचा तंबूही हटवला. जंतरमंतर येथून नवीन संसद भवनाकडे मोर्चा काढताना पोलिसांनी ही कारवाई केली. आता कुस्तीपटूंना ताब्यात घेतल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून दिल्लीची टिकरी सीमा पुन्हा एकदा पूर्णपणे सील करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी टिकरी सीमेवर बॅरिकेड लावून दिल्लीत प्रवेश करण्याचे सर्व मार्ग बंद केले आहेत. दुसरीकडे, कुस्तीपटूंवर केलेल्या कारवाईबाबत दिल्ली पोलिस चारही बाजूंनी घेरले आहे. विरोधी पक्षांनी या कृतीचा निषेध करत याला लाजिरवाणे म्हटले आहे. विशेषत: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ ट्विट केले आहेत. कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी ट्विट केले की, "खेळाडूंच्या छातीवरील पदके ही आपल्या देशाची शान आहे. त्या पदकांसह खेळाडूंच्या मेहनतीमुळे देशाचा मान वाढतो. भाजप सरकारचा अहंकार इतका वाढला आहे की सरकार निर्दयीपणे आपल्या महिला खेळाडूंचा आवाज बुटाखाली पायदळी तुडवत आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे, सरकारचा मग्रूर आणि हा अन्याय संपूर्ण देश पाहत आहे."

टॅग्स :Wrestlingकुस्तीdelhiदिल्लीrakesh tikaitराकेश टिकैत