शहरं
Join us  
Trending Stories
1
"२२ आमदार मुख्यमंत्र्याच्या हाती लागलेत..."; आदित्य ठाकरेंचा दावा, कुणावर साधला निशाणा?
2
जिनांच्या दबावापुढे काँग्रेसने गुडघे टेकले; 'वंदे मातरम्'वरील चर्चेदरम्यान PM मोदींचा घणाघात
3
बाजारात हाहाकार! सेन्सेक्स ८०० अंक तर निफ्टी २६,००० च्या खाली; 'या' ६ कारणांमुळे मोठी घसरण
4
चित्रपट हिट झाला अन् कंपनी मालामाल! 'धुरंधर'च्या जबरदस्त कमाईमुळे गुंतवणूकदारांनाही फायदा
5
Crime: एकत्र दारु प्यायले, नंतर UPI पिन चोरला, मग...; २० लाखांच्या FD साठी मित्रांनीच रचला कट!
6
"माझ्या नवऱ्याने गर्लफ्रेंडसाठी मला..."; बायकोला जीवे मारण्याची धमकी, ढसाढसा रडत पोलिसांत धाव
7
लाखोंचं एक-एक टी शर्ट विकणारं Versace का बुडालं; कोणी खरेदी केला ब्रँड, २०२५ ची 'मेगा-डील'
8
हायस्पीड इंटरनेट! भारतात Starlink चे सब्सक्रिप्शन किती रुपयांना मिळेल? कंपनीने जाहीर केली किंमत
9
'पैसे नाही, मला तूच पाहिजे!', वरिष्ठ अधिकाऱ्याच्या 'त्या' मागण्या, वेतनवाढही रोखली; कंटाळून नर्सने...
10
SMAT: डेब्यू सामन्यातच मोठा धमाका, ५५ चेंडूत ११४ धावा ठोकल्या; कोण आहे अमित पासी?
11
भगवद्गीतेची पुतिन यांनाही भुरळ, भारतातून परतताना विमानात केले वाचन; PM मोदींचा मान राखला!
12
Pune Crime: "माझ्या बहिणीसोबतचे प्रेमसंबंध तोड", रागावलेल्या बॉयफ्रेंडने २९ वेळा वार करत सोन्याला संपवले  
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील पाचपट! फिरतानाही दिसेल भारतीय संस्कृतीची झलक
14
तुमच्या पेन्शन ठेवींवर तुम्हाला व्याज मिळते का? पीएफ आणि EPS साठीच्या नियमात तुमचाही गोंधळ होतो?
15
'इंडिगो' प्रकरणानंतर सरकार सावध, अशी समस्या पुन्हा उद्भवू नये यासाठी केंद्राची राज्यसभेतून मोठी घोषणा
16
हळूहळू दिवाळखोर होतोय अमेरिका! डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजवटीत १५ वर्षांचा विक्रम मोडला
17
Video - कडक सॅल्यूट! पॅरालाइझ्ड आहे, कमकुवत नाही... ५२ वर्षीय Zepto डिलिव्हरी वुमन
18
'बोल्डनेस'चा कहर! युवराज सिंगसोबत समुद्राच्या मधोमध फोटोशूट, जाणून घ्या 'ती' सुंदरी कोण?
19
माझ्या बहिणीची हत्या करण्यात आलीये, पती आणि सासऱ्याने तिचा...; सरिता अग्रवाल यांच्या भावाचे गंभीर आरोप
20
IndiGo: प्रवाशांचे हाल, तिकीट खिडकीवर गोंधळ, विमानतळांवर सामानाचा ढिग; पाहा फोटो!
Daily Top 2Weekly Top 5

Rakesh Tikait: मोठी बातमी! राकेश टिकैत यांची BKU मधून हकालपट्टी, नरेश टिकैत यांच्याकडून अध्यक्षपद काढून घेतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 15:22 IST

भारतीय किसान युनियनमध्ये आता दोन गट पडले आहेत. टिकैत बंधू यांची हकालपट्टी केल्यानंतर BKU अराजकीय नावाने नवीन संघटना सुरू करण्यात आली आहे.

लखनौ: भारतीय किसान युनियनशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. शेतकरी आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले राकेश टिकैत यांची भारतीय किसान यूनियन(BKU)मधून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर, त्यांचे बंधू नरेश टिकैत यांनाही अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले आहे. त्यांच्या जागी राजेश चौहान यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आले आहे.

चौधरी महेंद्रसिंग टिकैत यांनी स्थापन केलेली भारतीय किसान युनियन म्हणजेच बीकेयू त्यांच्या पुण्यतिथीदिनीच दोन गटात विभागली गेली. राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेश सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली नवीन बीकेयू (अराजकीय) स्थापन करण्यात आली. राकेश टिकैत हे दोन दिवस लखनऊमध्ये राहून डॅमेज कंट्रोल करण्यात गुंतले होते, मात्र त्यांना यश आले नाही. संघटना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून राजकारणाकडे जात असल्याने अनेकजण टिकैत यांच्यावर नाराज आहेत.

शेतकऱ्यांचा लढा लढणे हेच माझे काम- राजेशबीकेयू (अराजकीय) चे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर राजेश सिंह चौहान यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, 'कार्यकारिणीने निर्णय घेतला आहे की, भारतीय किसान युनियन (अराजकीय) आता मूळ भारतीय किसान युनियनच्या जागी स्थापन करण्यात आली आहे. माझ्याकडे संस्थेचा 33 वर्षांचा इतिहास आहे. 13 महिन्यांच्या आंदोलनानंतर आम्ही घरी आलो तेव्हा आमचे नेते राकेश टिकैत हे राजकारणाने प्रेरित दिसले. आमचे नेते कुठल्यातरी राजकीय पक्षाच्या प्रभावाखाली येऊन एका पक्षाचा प्रचार करण्याचे आदेशही देत ​​असल्याचे आपण पाहिले. राजकारण करणे किंवा कोणत्याही पक्षाचे काम करणे हे माझे काम नाही. शेतकऱ्यांचा लढा लढणे हेच माझे काम असेल. मला कोणताही वाद निर्माण करायचा नाही.' 

राजेशसिंह चौहान यांच्याकडे नेतृत्व रविवारी म्हणजेच आज चौधरी महेंद्रसिंग टिकैत यांची 11वी पुण्यतिथी आहे. यानिमित्त लखनौ येथील ऊस संशोधन संस्था येथे सकाळी 9 वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. यामध्ये मूळ भारतीय किसान युनियन बदलून भारतीय किसान युनियन (अराजकीय) करण्यात आली. कार्यक्रमाचे नाव होते - 'शेतकरी आंदोलनाची स्थिती आणि दिशा'.

राकेश टिकैत असंतुष्टांना पटवून देऊ शकले नाहीतअसंतुष्ट शेतकरी नेत्यांचे मन वळवण्यासाठी बीकेयूचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत शुक्रवारी लखनौला पोहोचले होते. ते हरनाम सिंग यांच्या घरी थांबले. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत नाराज गटाशी बोलणी झाली, मात्र तोडगा निघाला नाही. यानंतर शनिवारी संध्याकाळी टिकैत लखनौहून मुझफ्फरनगरला परतले. तिथे आज महेंद्रसिंह टिकैत यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोठा कार्यक्रम होता. 

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतFarmerशेतकरी