शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांप्रमाणे राकेश टिकैत यांनीही केंद्राला झुकविले, ३३ वर्षांनंतर झाली घटनेची पुनरावृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 06:45 IST

महेंद्रसिंग टिकैत यांनी १९८८ साली शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी दिल्लीच्या बोट क्लब येथे ठिय्या आंदोलन सुरू केले होते. त्यासाठी देशभरातून पाच लाख शेतकरी तिथे जमले होते. विजय चौक ते इंडिया गेटपर्यंतचा सारा परिसर शेतकऱ्यांनी व्यापला होता.

नवी दिल्ली : आपले वडील महेंद्रसिंग टिकैत यांनी ३३ वर्षांपूर्वी केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केली आहे. १९८८ साली महेंद्रसिंग टिकैत यांनी केलेल्या शेतकरी आंदोलनापुढे तत्कालीन केंद्र सरकाराला झुकावे लागले होते. आता राकेश टिकैत यांच्या पुढाकाराने होत असलेल्या आंदोलनामुळे केंद्र सरकारला माघार घेऊन तीन नवे कृषी कायदे रद्द करावे लागले. 

महेंद्रसिंग टिकैत यांनी १९८८ साली शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी दिल्लीच्या बोट क्लब येथे ठिय्या आंदोलन सुरू केले होते. त्यासाठी देशभरातून पाच लाख शेतकरी तिथे जमले होते. विजय चौक ते इंडिया गेटपर्यंतचा सारा परिसर शेतकऱ्यांनी व्यापला होता. त्यावेळी लाल किल्ला परिसरात शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमारही केला होता. महेंद्रसिंग टिकैत यांनी सादर केलेल्या ३५ मागण्यांवर विचार करण्याचे आश्वासन केंद्रातील राजीव गांधी सरकारने दिले. केंद्र सरकार झुकल्यानंतर महेंद्रसिंग टिकैत यांनी आंदोलन मागे घेतले होते. 

शेतकऱ्यांच्या सामर्थ्यापुढे केंद्र सरकार झुकल्याच्या घटनेची पुनरावृत्ती २०२१ साली महेंद्रसिंग टिकैत यांचे पुत्र राकेश टिकैत यांच्यामुळेही झाली. तीन नवे कृषी कायदे मोदी सरकारने संसदेत मंजूर केले. मात्र, हे कायदे अन्यायकारक असल्याचा शेतकरी आंदोलकांचा आक्षेप होता.  आंदोलक किमान हमीभावासाठीही आग्रही आहेत. त्यात ज्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले, त्यामध्ये भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांचाही समावेश आहे. सुमारे वर्षभर सुरू असलेल्या आंदोलनात २६ जानेवारीला लाल किल्ला परिसरात हिंसाचार झाला. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी राकेश टिकैत यांना नोटीस बजावली. 

शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय --  गाझीपूर येथील सीमेवर शेतकऱ्यांनी सुरू केलेले ठिय्या आंदोलन मागे घेण्याचे टिकैत यांनी संकेत दिले होते. -  मात्र, देशभरातील शेतकरी आंदोलनाचा रेटा पाहून केंद्र सरकारने तीन नवे कृषी कायदे मागे घेतले. शेतकऱ्यांचा हा ऐतिहासिक विजय असल्याची प्रतिक्रिया राकेश टिकैत यांनी व्यक्त केली होती.  

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतNarendra Modiनरेंद्र मोदीRajiv Gandhiराजीव गांधीFarmers Protestशेतकरी आंदोलन