शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Farmers Protest: आता पेटवू सारे रान; महापंचायतीस लाखो शेतकऱ्यांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 06:43 IST

२० रोजी राकेश टिकैत येणार महाराष्ट्रात

- विकास झाडेनवी दिल्ली : सिंघू, टिकरी आणि गाजीपूर सीमा आहे तशाच अडविल्या जातील, सोबतच देशभर महापंचायत आयोजित करून ‘आता पेटवू सारे रान’चा बिगुल शेतकरी नेत्यांनी फुंकला आहे. आज कुरुक्षेत्रात झालेल्या महापंचायतीला लाखावर शेतकरी उपस्थित होते. संयुक्त किसान मोर्चाची बुधवारी बैठक होत आहे. आज शेतकरी आंदोलनाचा ७६वा दिवस आहे. २६ जानेवारी रोजी लाल किल्ल्यावर जाऊन ध्वज फडकविणाऱ्या दीप सिद्धूला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलन मंगळवारी सकाळी पंजाबमधून अटक केली. सिद्धू १४ दिवसांपासून फरार होता. पोलिसांनी त्याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. पोलीस मुख्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पेशल सेलच्या पथकाने त्याला पंजाबमधील झिरकपूर या भागातून अटक करण्यात आली आहे. गणतंत्र दिनी झालेल्या हिंसाचारानंतर शेतकऱ्यांनी आंदोलनाची नीती बदलली आहे. जे शेतकरी सिंघू, टिकरी, गाजीपूर आणि अन्य सीमांवर आहेत, ते तिथेच थांबतील. मात्र, शेतकरी नेते देशभर महापंचायतीचे आयोजन करतील.  आज कुरुक्षेत्रातील गुमतलू गढू इथे राकेश टिकैत यांची महापंचायत झाली. त्या सभेला लाखांवर शेतकरी उपस्थित होते. महाराष्ट्रातून संदीप गिड्डे पाटील, युद्धवीर सिंग हेही मार्गदर्शक होते. राकेश टिकैत हे आता केंद्रस्थानी आहेत. त्यांना विविध ठिकाणांहून सभेसाठी आमंत्रित केले जाते. येत्या २० फेबु्वारीला महाराष्ट्रात भव्य सभा आयोजित करण्यात येत असल्याची माहिती संदीप गिड्डे पाटील यांनी दिली. स्थळ मात्र ठरायचे आहे. शेतकऱ्याचा मृत्यूसीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना धान्यवाटप करणाऱ्या एका तरुण शेतकऱ्याचा ट्रॅक्टरवरून पडून मृत्यू झाला. रोहतक जिल्ह्यातील दीपक नावाचा २८ वर्षांचा हा शेतकरी स्वत: आंदोलनात सहभागी होता. गेल्या आठवड्यात ट्रॅक्टरवर बसून तो धान्याचे वाटप करीत होता. अचानक तोल गेल्याने तो ट्रॅक्टरवरून पडला. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैत