शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

आता एका व्यक्तीलाही ठरवता येणार दहशतवादी; UAPA विधेयक राज्यसभेत मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 15:07 IST

राज्यसभेत आज UAPA दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे.

नवी दिल्लीः राज्यसभेत आज बेकायदा प्रतिबंधक हालचाली सुधारणा(UAPA) विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. या विधेयकाला मंजुरी मिळाल्यामुळे NIAला जास्तीत जास्त अधिकार मिळणार असून, संघटनेबरोबरच एखाद्या व्यक्तीलाही दहशतवादी घोषित करता येणार आहे. UAPA विधेयकानुसार ज्या व्यक्तीला दहशतवादी घोषित करण्यात येईल, त्याची संपत्ती जप्त केली जाणार आहे. तसेच त्या संबंधित व्यक्तीच्या देश-विदेशातील दौऱ्यांवर प्रतिबंध घातले जाणार आहेत. UAPA दुरुस्ती विधेयकावर राज्यसभेत जोरदार चर्चा झाली. सभागृहात चर्चेदरम्यान काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी या विधेयकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनीही सडेतोड उत्तर दिलं. राज्यसभेत या विधेयकावर मतदान घेण्यात आले असता, विधेयकाच्या बाजूनं 147 मतं पडली असून, विरोधात 42 मतं गेली आहेत. 

गृहमंत्री अमित शहा यांनी बेकायदा प्रतिबंधक हालचाली सुधारणा विधेयक 2019वर राज्यसभेत उत्तर दिलं. दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठी या कायद्याचा फायदा होणार असल्याचं अमित शाहांनी सभागृहात सांगितलं. दहशतवादाविरोधात एकत्र येणं गरजेचं आहे. विरोधकांनी या कायद्याचा दुरुपयोग केला जाईल, अशी शंका उपस्थित केली. त्यावर अमित शाह म्हणाले, जेव्हा आम्ही विरोधात होतो, तेव्हा आम्ही या UAPA विधेयकांचं समर्थन केलं होतं. मग 2004 असो, 2008 किंवा 2013 प्रत्येक वेळी आम्ही या विधेयकाचं समर्थनच केलं आहे.दहशतवाद्यांचा कोणताही धर्म नसतो, त्यामुळे दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची प्रत्येकाचीच भावना आहे. दहशतवाद हा मानवतेच्या विरोधात आहे, तो कोणत्याही विशेष समाजाच्या व्यक्तीच्या विरोधात नाही. 31 जुलै 2019पर्यंत NIAने एकूण 278 प्रकरणांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. 204 प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. त्यातील 54 प्रकरणांवर निर्णय आला आहे. 54 मधील 48 प्रकरणात दहशतवाद्यांना शिक्षा झाली आहे.  

टॅग्स :Amit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदी