शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं प्रदीर्घ आजारानं निधन; ६४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 17:16 IST

गेल्या अनेक दिवसांपासून अमर सिंह यांच्यावर सिंगापूरमधील रुग्णालयात सुरू होते उपचार

राज्यसभेचे खासदार अमर सिंह यांचं निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर सिंगापूरमध्ये उपचार सुरू आहे. आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ६४ व्या वर्षी अमर सिंह यांनी अखेरचा श्वास घेतला. केंद्रात काँग्रेसप्रणित यूपीएचं सरकार असताना सिंह यांचं नाव कायम चर्चेत असायचं. मुलायम सिंह यादव समाजवादी पक्षाचे प्रमुख असताना अमर सिंह राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत होते. अमिताभ बच्चन यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते. मात्र नंतर हे संबंध बिघडले. त्याबद्दल फेब्रुवारी महिन्यात सिंह यांनी माफीदेखील मागितली होती.गेल्या काही महिन्यांपासून अमर सिंह यांच्यावर सिंगापूरमधल्या रुग्णालयात उपचार सुरू होते. ते आयसीयूमध्ये होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर निवडून गेले होते. ५ जुलै २०१६ रोजी त्यांची खासदार म्हणून निवड झाली. समाजवादी पक्षापासून दूर गेल्यानंतर त्यांची राजकारणातील सक्रियता कमी झाली होती. प्रकृतीच्या समस्या उद्भवण्यापूर्वी ते भाजपाच्या जवळ गेले होते. देशात यूपीएचं सरकार असताना आणि समाजवादी पक्षात मुलायम सिंह यादव यांचा शब्द अंतिम समजला जात असताना अमर सिंह राष्ट्रीय राजकारणात पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत होते. १९९६ मध्ये अमर सिंह राज्यसभेवर पहिल्यांदा निवडून गेले. इथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. २००२, २००८ मध्येही अमर सिंह राज्यसभेवर निवडून गेले. मुलायम सिंह यादव यांच्यासोबत बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबतही त्यांचे अतिशय घनिष्ठ संबंध होते. मात्र गेल्या काही वर्षांत त्यांच्या नात्यात कटुता निर्माण झाली. या प्रकरणी सिंह यांनी याच वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात एका व्हिडीओच्या माध्यमातून माफी मागितली.२०१७ मध्ये समाजवादी पक्षापासून दूरएकेकाळी मुलायम सिंह यादव यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे अमर सिंह २०१७ मध्ये पक्षापासून दूर गेले. समाजवादी पक्षात शिवपाल यादव आणि अखिलेश यादव असे दोन गट पडले. या वादाला अखिलेश यांनी अमर सिंह यांना जबाबदार धरलं. अखिलेश यांनी अनेकदा अमर सिंह यांच्यावर जाहीरपणे टीका केली. त्यानंतर अमर सिंह भाजपाच्या कार्यक्रमांमध्ये दिसू लागले. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संस्थेला संपूर्ण संपत्ती दान करत असल्याची घोषणा केली होती. 

टॅग्स :Mulayam Singh Yadavमुलायम सिंह यादवAmitabh Bachchanअमिताभ बच्चन