शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

उद्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेससाठी फक्त 1 मत ठरणार निर्णायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 17:57 IST

गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी उद्या निवडणूक होत असून सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

ठळक मुद्देगुजरात विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसच्या मनोधैर्याचे खच्चीकरण करण्याची भाजपाची रणनिती आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकर सिंह वाघेला फुटल्यानंतर काँग्रेसच्या आणखी सहा आमदारांनी बंडखोरी केली.

सूरत, दि. 7 - गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी उद्या निवडणूक होत असून सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अहमद पटेल गुजरातमधून राज्यसभेची निवडणूक लढवत असल्याने सर्वांचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. अहमद पटेल यांचा राज्यभेत जाण्याचा मार्ग रोखून वर्षअखेरीस होणा-या गुजरात विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसच्या मनोधैर्याचे खच्चीकरण करण्याची भाजपाची रणनिती आहे. 

गुजरात काँग्रेसमध्ये मोठया प्रमाणावर बंडखोरी झाली आहे त्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत असल्याने सगळयांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकर सिंह वाघेला फुटल्यानंतर काँग्रेसच्या आणखी सहा आमदारांनी बंडखोरी केली. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीपर्यंत आणखी पडझड होऊ नये म्हणून काँग्रेसला उर्वरित 44 आमदारांना बंगळुरुतल्या रिसॉर्टमध्ये ठेवावे लागले. कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आहे.  

अहमद पटेल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव आहेत. त्यांना विजयासाठी 45 मतांची आवश्यकता आहे. काँग्रेसकडे सध्या 44 आमदार आहेत. आज सकाळीच हे सर्व आमदार बंगळुरूहून गुजरातमध्ये परतले. त्या सर्वांना आनंद जिल्ह्यातील रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे. 44 आमदारांपैकी कोणी क्रॉस व्होटिंग किंवा नोटाचा पर्याय वापरला नाही तर, काँग्रेसला अहमद पटेल यांच्या विजयासाठी फक्त एका आमदाराच्या पाठिंब्याची गरज भासेल. 

तीन जागांसाठी एकूण चार उमेदवार रिंगणात आहेत. शहा आणि इराणी वगळता भाजपाने बलवंतसिंह राजपूत यांना रिंगणात उतरवले आहे. त्यांनी अलीकडेच काँग्रेससोडून भाजपामध्ये प्रवेश केला. पटेल यांच्या विजयासाठी काँग्रेस गुजरात विधानसभेतील राष्ट्रवादीचे दोन आमदार, संयुक्त जनता दल आणि गुजरात परिवर्तन पार्टीच्या प्रत्येकी एका आमदारावर  अवलंबून आहे. कुठल्या पक्षाला पाठिंबा देण्यासंबंधी अद्याप निर्णय झालेला नाही असे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी रविवारी सांगितले. 

अहमद पटेल उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी आणि जदयूचा आमदार त्यांच्यासोबत होता. काँग्रेसच्या 51 आमदारांपैकी सात आमदार बंगळुरुला गेले नव्हते. हे आमदार वाघेल यांच्या गटातील असून त्यांच्यापैकी एक आमदार मदत करेल असा काँग्रेसला विश्वास आहे. 182 सदस्यांच्या गुजरात विधानसभेत काँग्रेसचे 57 आमदार होते. त्यातील सहा आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ 51 झाले.