शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Rajya Sabha Election: केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक संपली; थोड्याच वेळात निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 22:26 IST

मागील ५ तासांपासून ही मतमोजणी रखडलेली होती. त्यानंतर आत्ताच केंद्रीय निवडणूक आयोगाची दीड तासांपासून सुरू असलेली बैठक संपली आहे.

नवी दिल्ली - राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत २८५ आमदारांनी मतदान केले. परंतु मतमोजणीवेळी नाट्यमय घडामोड घडली. भाजपाने मविआचे नेते जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर यांच्यावर आक्षेप घेत निवडणुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप केला. ही मते बाद करण्यात यावी अशी मागणी भाजपाने केली. त्यानंतर हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पोहचला. 

मागील ५ तासांपासून ही मतमोजणी रखडलेली होती. त्यानंतर आत्ताच केंद्रीय निवडणूक आयोगाची दीड तासांपासून सुरू असलेली बैठक संपली आहे. या बैठकीत मविआ आणि भाजपा यांनी एकमेकांवर केलेल्या आरोपांवर चर्चा झाली. या बैठकीला मुख्य निवडणूक आयुक्तांसोबत राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांचीही ऑनलाईन उपस्थित होती. निवडणूक आयोगाची बैठक संपल्यानंतर आता थोड्याच वेळात निर्णय येण्याची अपेक्षा आहे. 

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?मी मतदान करून माझ्या पक्षाचे प्रतिनिधी होते त्यांनाच मतपत्रिका दाखवली. कागद माझ्या छातीवर होता. कॅमेरा माझ्या मागे होता. मतपत्रिका बंद केली, मतदान केले आणि गेटवर आलो. तोपर्यंत कुणीही आक्षेप घेतला नव्हता. अर्ध्या तासाने माझ्या मतदानावर आक्षेप घेतल्याचं कळालं. मी कुठलाही गुन्हा केलाय असं मला वाटत नाही. काहीही कारण नसताना हा खेळ लांब घेऊन निघाले आहेत. काहीतरी रडीचा डाव खेळायचा असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी भाजपावर केला. 

 

निवडणूक आयोगाने मागवले होते व्हिडीओनिवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाचे व्हिडीओ मागवले होते. शिवसेनेचा आरोप होता की, आमदार रवी राणा यांनी मतदानावेळी त्यांच्यासोबत हनुमान चालीसा आणली होती. व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्येही हे स्पष्ट दिसते. निवडणूक प्रक्रियेचा हा भंग आहे. निवडणूक आचारसंहितेच्या विरोधात आहे असं म्हटलं होतं.  

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग