शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

Rajya Sabha Election: लोकसभेनंतर आता राज्यसभेतही भाजपचा मुस्लिम चेहरा नाही, मुख्तार नक्वींचे मंत्रिपद धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 12:56 IST

Rajya Sabha Election: केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी, एमजे अकबर आणि सैय्यद जफर इस्लाम यांचा कार्यकाळ संपत आला आहे. पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिलेली नाही.

Rajya Sabha Election: देशातील विविध राज्यांमध्ये राज्यसभेच्या 57 जागांसाठी निवडणूक होत आहे. भाजपने आपल्या कोट्यातून राज्यसभेच्या 22 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत, मात्र पक्षाने एकाही मुस्लिम चेहऱ्याला यावेळेस उमेदवारी दिलेली नाही. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी ते एमजे अकबर आणि सय्यद जफर इस्लाम यांचा कार्यकाळ पुढील महिन्याच्या सुरुवातीला संपत आहे. अशा परिस्थितीत भाजपने तीनपैकी एकाही मुस्लिम नेत्याला पुन्हा संधी दिलेली नाही, त्यामुळे लोकसभेप्रमाणे राज्यसभेतही भाजपचा एकही मुस्लिम चेहरा दिसणार नाही.

सध्या लोकसभेत भाजपचा एकही मुस्लिम खासदार नाही, पण राज्यसभेत पक्षाचे तीन मुस्लिम चेहरे आहेत. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, माजी मंत्री एमजे अकबर आणि सय्यद जफर इस्लाम. यापैकी अकबर यांचा कार्यकाळ 29 जून 2022 रोजी संपत आहे, तर नक्वी यांचा कार्यकाळ 7 जुलै आणि सय्यद जफर इस्लामचा कार्यकाळ 4 जुलै 2022 रोजी संपणार आहे. जफर इस्लाम हे दोन वर्षांपूर्वी यूपीतून पोटनिवडणुकीत निवडून आले होते. एमजे अकबर मध्य प्रदेशातून आणि मुख्तार अब्बास नक्वी झारखंडमधून राज्यसभेत पोहोचले.

भाजपच्या तीनही मुस्लिम राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ महिनाभरात संपणार आहे, त्यामुळे त्यांच्या जागांवर निवडणूक होत आहे. भाजपने तीनपैकी एकाही मुस्लिम नेत्याला राज्यसभेसाठी उमेदवारी दिलेली नाही. अशा परिस्थितीत मुख्तार अब्बास नक्वी यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. नक्वी पुन्हा संसदेत पोहोचले नाहीत, तर सहा महिन्यांत त्यांचे मंत्रीपद जाणार आहे. अशा स्थितीत भाजप त्यांना रामपूर लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीत उतरवण्याची राजकीय शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपचे मुस्लिम चेहरे किती प्रभावी?भाजपमधील मुस्लिम चेहरे अटल सरकारपासून मोदींपर्यंत मंत्री होते, पण ते त्यांचा राजकीय प्रभाव सोडू शकले नाहीत. नक्वी पहिल्यांदाच लोकसभा जिंकले आणि 1998 मध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री बनले, परंतु तेव्हापासून ते अल्पसंख्याक मंत्र्यापुरते मर्यादित राहिले. शाहनवाज हुसेन यांनी आता राष्ट्रीय राजकारणातून बिहारच्या राजकारणाकडे वाटचाल केली आहे. सध्या ते बिहारमधील जेडीयू-भाजपच्या संयुक्त सरकारमध्ये उद्योगमंत्री आहेत. शाहनवाज हुसेन यांना नक्वींप्रमाणेच अटल सरकारमध्ये महत्त्व मिळाले असले तरी ते मोदींच्या राजवटीत दुर्लक्षित राहिले.

एमजे अकबर यांना राज्यसभा सदस्य करून परराष्ट्र राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अकबर यांचा राजकीय प्रभाव होता, पण मी-टूमध्ये त्यांचे नाव आल्यानंतर त्यांची मंत्रीपदाची खुर्चीही गेली आणि राजकीयदृष्ट्या बाजूलाही झाली. नजमा हेपतुल्ला यांना 2014 मध्ये अल्पसंख्याक व्यवहारांसाठी कॅबिनेट मंत्री बनवण्यात आले होते, परंतु नंतर त्यांना राज्यपाल करण्यात आले.

टॅग्स :BJPभाजपाRajya Sabhaराज्यसभा