शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
4
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
5
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
6
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
7
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
8
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
9
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
10
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
11
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
12
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
13
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
14
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
15
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
16
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
17
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
18
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
19
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
20
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम

राज्यसभा निवडणुकीत भाजपचा 'नो-रिपीट फॉर्म्युला'; अनेक दिग्गजांचे तिकीट कापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 16:27 IST

भाजपकडून गुजरातमधील 2, महाराष्ट्रातील 2 आणि आसाममधील 2 उमेदवारांची नावे भाजपने जाहीर केली आहेत.

नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी आपल्या 11 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये 9 नावे भाजप नेत्यांची आणि 2 नावे एनडीए मित्रपक्षांच्या नेत्यांची आहेत. तर राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने अनेक दिग्गज नेत्यांची तिकिट नो-रिपीट फॉर्म्युलाखाली कापली असून, त्यांच्या जागी नवीन चेहरे राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपकडून गुजरातमधील 2, महाराष्ट्रातील 2 आणि आसाममधील 2 उमेदवारांची नावे भाजपने जाहीर केली आहेत. त्याचबरोबर मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, मणिपूर आणि राजस्थानमधून एका उमेदवाराचे नावे जाहीर केले आहे. मध्य प्रदेशातून ज्योतिरादित्य शिंदे आणि गुजरातमधून अ‍ॅडव्होकेट अभय भारद्वाज या नेत्यांची नेमणूक भाजपने केली आहे. यासह भाजपने महाराष्ट्रातील एनडीएचे सहयोगी आरपीई (ए) चे रामदास आठवले आणि आसाममधून बोडोलँड पीपल्स फ्रंटचे बिस्वजीत डाईमरी यांना उमेदवारी दिली आहे.

या महिन्याच्या अखेरीस रिक्त होत असलेल्या राज्यसभेच्या जागांच्या उमेदवारांची घोषणा भाजपने केली असून, जवळपास सर्वच जागांवर नवीन चेहरे देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्यावेळी उमेदवारी दिलेल्या नेत्यांना यावेळी नारळ देण्यात आला आहे. तर यात अनेक दिग्गज नेत्यांचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे भाजपकडून नो-रिपीटचा फॉर्म्युला राबवण्यात आला असल्याचे पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रात राज्यसभेच्या एकूण 7 जागा रिक्त आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेस दोन, काँग्रेस, शिवसेना,भाजप, रिपब्लिक पार्टी आणि अपक्ष प्रत्येकी एक जागा आहे. तर रामदास आठवले आणि अमरशंकर साबळे हे भाजपच्या कोट्यातून राज्यसभेचे सदस्य आहेत. भाजपने रामदास आठवले यांना यावेळी पुन्हा उमेदवारी दिली आहे, परंतु अमर शंकर साबळे यांचे तिकीट कापले असून त्यांच्या जागी उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली आहे. तसेच भाजपने तिसर्‍या जागेवर डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेचे उमेदवार दिली आहे.