शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयकावरून गदारोळ, काँग्रेसची दुटप्पी भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 17:59 IST

लोकसभेत मंजूर झालेलं ट्रिपल तलाकचं विधेयक आज राज्यसभेत मांडण्यात आलं आहे.

नवी दिल्ली- लोकसभेत मंजूर झालेलं तिहेरी तलाकचं विधेयक आज राज्यसभेत मांडण्यात आलं आहे. या विधेयकावरून राज्यसभेत मोठा गदारोळ झाला आहे. तिहेरी तलाक विधेयक सादर करताच विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला आहे.मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनं या विधेयकातील अनेक तरतुदींवर तीव्र आक्षेप घेतला आहे. इतर विरोधी पक्षांनीही काँग्रेसच्या सुरात सूर मिसळला आहे. विरोधकांच्या ब-याचशा सदस्यांनी या विधेयकाला स्थायी समितीकडे पाठवण्याची मागणी केली आहे. विरोधकांच्या गदारोळाला कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही चोख प्रत्युत्तर दिलं आहे.काही जण विनाकारण विरोधाच्या नावाखाली या विधेयकाला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत, असं म्हणत प्रसाद यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. गदारोळानंतर राज्यसभा उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. राज्यसभेमध्ये बहुमत नसल्यानं भाजपालाही विधेयकाला मंजुरी मिळवून देण्यात अडचणी आल्या आहेत.महिलांच्या दृष्टीने अन्यायकारक अशी मुस्लीम समाजातील ‘तिहेरी तलाक’ची प्रथा सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरविल्यानंतर असा तलाक देणे हा फौजदारी गुन्हा ठरवून त्यासाठी पतीला तुरुंगात पाठविण्याची तरतूद असलेले विधेयक केंद्रातील मोदी सरकारने गुरुवारी (28 डिसेंबर 2017)बहुमताच्या जोरावर लोकसभेत मंजूर करून घेतले होते. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांचा विरोध व दुरुस्त्या नाकारून मंजुरी मिळाली असली तरी सत्ताधा-यांचे बहुमत नसलेल्या राज्यसभेत हे विधेयक मंजूर करून घेण्यात भाजपाला अपयश आलं आहे.  

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस