शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत होऊ शकले नाही सादर, राज्यसभा 2 जानेवारीपर्यंत स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 15:41 IST

तिहेरी तलाक विधेयक आजही राज्यसभेत सादर करण्यात आलेलं नाही.

ठळक मुद्देतिहेरी तलाक विधेयक आजही राज्यसभेत सादर करण्यात आलेलं नाही. काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनी तिहेरी तलाकच्या मुद्द्यावरून भाजपाला धारेवर धरलं.मोठा गदारोळ झाल्यानं 2 जानेवारीपर्यंत स्थगित

नवी दिल्ली- तिहेरी तलाक विधेयक आजही राज्यसभेत सादर करण्यात आलेलं नाही. लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत सादर करण्यात येणार होतं. राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनी तिहेरी तलाकच्या मुद्द्यावरून भाजपाला धारेवर धरलं. ते म्हणाले, आम्ही विधेयक मंजूर करू, पण पहिल्यांदा ते संसदीय निवड समितीकडे पाठवावे. कारण या विधेयकातील तरतुदीचा सखोल अभ्यास व्हायला हवा. त्यानंतर कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनीही सांगितलं की, प्रस्तावावरील चर्चेसाठी आम्ही तयार आहोत. परंतु विरोधकांनी विधेयकाला विरोध करू नये, त्यानंतर राज्यसभेत मोठा गदारोळ झाला. या गदारोळामुळेच उपसभापती हरिवंश सिंह यांनी 2 जानेवारी सकाळी 11 वाजेपर्यंत राज्यसभा स्थगित केली आहे. ‘ट्रिपल तलाक’ विधेयक आज राज्यसभेत सादर करण्यात येणार होते, परंतु ते सादर केलेले नाही. तर हे विधेयक सद्य:स्थितीत मंजूर होऊ देणार नसल्याचंही काँग्रेसनं आधीच स्पष्ट केलं होतं. सत्तारूढ भाजपाने वरिष्ठ सभागृहात व्हिप जारी करून आपल्या सदस्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. कायदामंत्री रविशंकर प्रसाद राज्यसभेत हे विधेयक सादर करणार होते. या विधेयकाला गुरुवारी लोकसभेत मंजुरी मिळाली आहे. विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर या विधेयकाच्या बाजूने 245, तर विरोधात 11 मते पडली होती.रविशंकर प्रसाद यांनी शुक्रवारीच असा दावा केला आहे की, भलेही राज्यसभेत भाजपाकडे पर्याप्त संख्याबळ नसेल; पण सभागृहात या विधेयकाला समर्थन मिळेल. अ.भा. काँग्रेस समितीचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी शनिवारी कोचीमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले की, समविचारी पक्षांना बरोबर घेऊन हे विधेयक मंजूर होऊ देणार नाही. 10 विरोधी पक्ष लोकसभेत या विधेयकाविरुद्ध समोर आले होते, असेही ते म्हणाले. तथापि, अण्णाद्रमुकसह जे पक्ष विविध मुद्द्यांवर सरकारचे समर्थन करीत होते, त्यांनीही या विधेयकाला विरोध केल्याचे वेणुगोपाल यांनी सांगितले. विरोधकांनी ट्रिपल तलाकच्या तरतुदीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या विधेयकावर आणखी विचार करण्यासाठी ते संसदेच्या संयुक्त निवड समितीकडे पाठविण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. 

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकRajya Sabhaराज्यसभा