शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Video: 'सुपर मारियो'च्या रुपात राजनाथ सिंह; सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2018 17:59 IST

राजनाथ सिंह यांचा मारियो रुपातील व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: मोदी सरकारला चार वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या निमित्तानं सरकारमधील मंत्री त्यांच्या कामांची माहिती देत आहेत. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही त्यांच्या कामाची दिली आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गृह मंत्रालयानं चार वर्षांत केलेल्या कामांची माहिती यामधून देण्यात आली आहे. या व्हिडीओचं वैशिष्ट्य म्हणजे, बहुचर्चित व्हिडीओ गेम 'सुपर मारियो'च्या धर्तीवर हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. यामध्ये राजनाथ यांना 'मारियो'च्या जागी दाखवण्यात आलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सव्वा दोन मिनिटांच्या व्हिडीओत राजनाथ 2014 मध्ये गेमची सुरुवात करताना दिसतात. त्यावेळी राजनाथ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि त्यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षानं लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आणि एकहाती सत्ता काबीज केली. यानंतर नक्षलवाद्यांविरुद्धच्या कारवाया, ईशान्य भारतातील मोहिमा, भारत के वीर यासारख्या योजना आणि त्यांना मिळालेलं यश व्हिडीओतून अधोरेखित करण्यात आलं आहे. या व्हिडीओत राजनाथ मारियोप्रमाणेच एक-एक आव्हान पार करताना दिसत आहेत. 

1983 मध्ये डिझाईन करण्यात आलेला सुपर मारियो हा व्हिडीओ गेम 1990 च्या सुमारास भारतात खूप लोकप्रिय झाला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत राजनाथ सिंह शून्य पॉईंटपासून सुरू करतात. या गेममध्ये राजनाथ यांना 18 हजार 650 पॉईंट्स मिळतात. राजनाथ यांनी काही दिवसांपूर्वीच जम्मू काश्मीरचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहNarendra Modiनरेंद्र मोदीSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल