शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

राजनाथ सिंह यांना सलामी देण्यास नकार जोधपूरमधील पोलिसांचा नवा पवित्रा; वेतनकपातीच्या चर्चेमुळे २५० कर्मचारी सुट्टीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 01:09 IST

पोलिसांच्या वेतनात कपात होणार असल्याच्या चर्चांमुळे या संभाव्य निर्णयाला विरोध म्हणून जोधपूरमधील २५० पोलिसांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर एक दिवसांची सुटी घेतली.

जयपूर : पोलिसांच्या वेतनात कपात होणार असल्याच्या चर्चांमुळे या संभाव्य निर्णयाला विरोध म्हणून जोधपूरमधील २५० पोलिसांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर एक दिवसांची सुटी घेतली. म्हणजेच गृहमंत्री राजनाथ सिंह यांना देण्यात येणारी सलामी म्हणजेच ‘गार्ड आॅफ आॅनर’ देण्यास या पोलिसांनी अप्रत्यक्षपणे नकार दर्शविला.गुप्तचर विभागाच्या एका विभागीय प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनासाठी राजनाथ सिंह येथे आले होते. जोधपूरचे पोलीस आयुक्त अशोक राठौर यांनी सांगितले की, २५० पोलीस कर्मचारी एक दिवसाच्या सुटीवर गेले.यातील काही पोलीस ‘गार्ड आॅफ आॅनर’च्या टीममध्ये होते. या पोलिसांनी येण्यास नकार दिल्याने अन्य पोलिसांना सोबत घेण्यात आले. सुटी मंजूर नसताना कामावर न येणे हा शिस्तभंगाचा भाग आहे. त्यामुळे या पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकेल.अतिरिक्त पोलीस महासंचालक एम.एल. लाठार यांनाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला. पोलिसांनी त्यांनाही ‘गार्ड आॅफ आॅनर’देण्यास नकार दिला. राजस्थानचे डीजीपी अजित सिंह यांनी सांगितले की, कोणत्याही कर्मचाºयांचे असे वर्तन सहन केले जाणार नाही. वेतन कपातीच्या या फक्त अफवाच आहेत. (वृत्तसंस्था)असा प्रस्ताव नाहीकॉन्स्टेबलचे वेतन २४,००० रुपयांवरुन १९,००० रुपये होणार असल्याच्या चर्चा येथे आहेत. राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी या अफवा फेटाळून लावत स्पष्ट केले आहे की, पोलिसांचे वेतन कमी करण्याबाबतचा असा कोणताही आदेश सरकारने जारी केलेला नाही. वेतनाशी संबंधित प्रकरणे कॅबिनेट समितीसमोर आहेत. त्यामुळे याबाबत कोणताही भ्रम असायला नको.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहPoliceपोलिस