शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

बिपीन रावत यांना जाऊन 6 महिने झाले, नवीन CDS नियुक्ती कधी होणार? राजनाथ सिंह म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 15:59 IST

Rajnath Singh On CDS Appointment: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी नवीन CDS नियुक्तीबाबत महत्वाची माहिती दिली.

Rajnath Singh On CDS Appointment: देशातील पहिले CDS जनरल बिपिन रावत यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या या पदावरील नव्या नियुक्तीबाबत केंद्र सरकारकडून मोठी माहिती समोर आली आहे. सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेच्या शुभारंभप्रसंगी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, 'नवीन सीडीएसची नियुक्ती लवकरच केली जाईल, ही प्रक्रिया वेगाने सुरू आहे.' काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने सीडीएसच्या नियुक्तीसंदर्भात नियम बदलले आहेत. नवीन नियमानुसार, लेफ्टनंट जनरल किंवा जनरल किंवा त्याच्या समकक्ष किंवा सेवारत लेफ्टनंट जनरल किंवा जनरल या रँकचा सेवानिवृत्त अधिकारी CDS म्हणून नियुक्त केला जाऊ शकतो. परंतु नियुक्तीच्या वेळी त्या अधिकाऱ्याचे वय 62 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

सीडीएस पदाची मागणी केव्हा करण्यात आली?कारगिल युद्धादरम्यान लष्कर, हवाई दल आणि नौदल यांच्यातील समन्वयाचा अभाव निदर्शनास आला होता. 1999 मध्ये कारगिल युद्धातील विजयानंतर तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकारने एक समीक्षा समिती स्थापन केली होती. तिन्ही सेवांमधील समन्वयाचा अभाव दूर करण्यासाठी समितीने सूचना केल्या होत्या. समितीने तिन्ही सेवांमध्ये समन्वयासाठी एक पद निर्माण करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर, नरेंद्र मोदी सरकारने 24 डिसेंबर 2019 रोजी CDS पदाची घोषणा केली आणि जनरल बिपिन रावत हे देशातील पहिले CDS बनले. सीडीएसची नियुक्ती वयाच्या 63 वर्षापर्यंत करता येते.

केंद्र सरकारने नियम बदलले सरकारने लष्कर, नौदल आणि हवाई दल सेवा कायद्यात बदल केले असून त्याची अधिसूचना आज जारी करण्यात आली. अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की, सार्वजनिक हितासाठी, लेफ्टनंट जनरल किंवा जनरल किंवा त्याच्या समकक्ष किंवा सेवारत लेफ्टनंट जनरल किंवा जनरल या रँकचा सेवानिवृत्त अधिकारी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्त केला जाऊ शकतो. थ्री स्टार जनरल्स म्हणजे लष्करातील लेफ्टनंट जनरल, वायुसेनेतील एअर मार्शल आणि नौदलातील व्हाईस अॅडमिरल वयाच्या 60 व्या वर्षी निवृत्त होतात. त्यामुळे दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत निवृत्त झालेल्या कोणत्याही तीन स्टार जनरलचाही सीडीएस होण्याच्या शर्यतीत विचार केला जाऊ शकतो.

CDS ला कोणते अधिकार आहेत?CDS हे भारतीय सशस्त्र दलाच्या चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे लष्करी प्रमुख आहेत. हा भारतीय लष्करातील सर्वोच्च दर्जाचा अधिकारी आहे. CDS हे संरक्षण मंत्रालयाचे मुख्य लष्करी सल्लागार आहेत. हे अधिकारी पंतप्रधानांचे लष्करी सल्लागारही आहेत. सीडीएस हे लष्करी व्यवहार विभागाचे प्रमुख देखील आहेत. सीडीएस तीन सेवांमध्ये समन्वय म्हणून काम करतात. समन्वयामुळे, आपत्कालीन परिस्थितीत तिन्ही सैन्यांचा चांगला संपर्क होऊ शकतो. सीडीएस न्यूक्लियर कमांड अथॉरिटीचे लष्करी सल्लागार म्हणूनही काम करतात.

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतRajnath Singhराजनाथ सिंहDefenceसंरक्षण विभाग