शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

राजनाथसिंग यांना भेटलेला अजमेर दर्ग्याचा प्रमुख तोतया? अबेदिन यांच्या मुलाने केला भेटीचा इन्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 22:26 IST

रामजन्मभूमी-बाबरी मशिद वादाच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना बुधवारी भेटलेल्या सूफी मुस्लिम धर्मगुरुंच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती दर्ग्याचे प्रमुख म्हणून कोणी तोतयाने केले असावे अशी शंका निर्माण झाली आहे.

नवी दिल्ली: रामजन्मभूमी-बाबरी मशिद वादाच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना बुधवारी भेटलेल्या सूफी मुस्लिम धर्मगुरुंच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती दर्ग्याचे प्रमुख म्हणून कोणी तोतयाने केले असावे अशी शंका निर्माण झाली आहे.अजमेर दर्ग्याचे प्रमुख सैयद झैनुल अबेदिन यांच्या नेतृत्वाखाली १२ सूफी धर्मगुरुंचे शिष्टमंडळ राजनाथ सिंग यांना त्यांच्या अकबर रोडवरील निवासस्थानी भेटले, असे गृहमंत्र्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.मात्र अजमेर दर्ग्याचे प्रमुख राजनाथ सिंग यांना भेटल्याचा सैयद झैनुल यांचे चिरंजीव सैयद नसीरुद्दीन अबेदिन यांनी इन्कार केला. सैयद नसरुद्दीन म्हणाले, अजमेर दर्ग्यात सुमारे ४,००० खादिम (सेवादार) आहेत. आपण अजमेर दर्ग्याचे प्रमुख असल्याचा बहाणा करून एक व्यक्ती श्री श्री रविशंकर यांच्यासोबत फिरत असते. हा ‘तोतया’ माझ्या वडिलांसारखा पोषाखही करतो.‘आर्ट आॅफ लीव्हिंग’चे प्रमुख श्री श्री रविशंकर हे शिष्टमंडळ घेऊन राजनाथ सिंग यांच्याकडे जातील, असे आधी ठरले होते. परंतु ऐनवेळी लखनऊ येथे जावे लागल्याने ते आले नाहीत. आपण याच आठवड्यात अयोध्येला जाऊन सर्व संबंधितांशी चर्चा करू, असे रविशंकर यांनी सोमवारी सांगितले होते.अयोध्येचा वाद सर्वसंमतीने सुटावा यासाठी रविशंकर करत असलेल्या प्रयत्नांपासून भाजपा चार हात दूर आहे. राम जन्मभूमी न्यासचे माजी प्रमुख व भाजपाचे माजी खासदार राम विलास वेदान्ती यांनीही रामजन्मभूमी आंदोलनाशी रविशंकर आधीपासून संबंधित नसल्याने आता मध्यस्थी करण्यास ते मुळीच पात्र नाहीत, असे म्हटले आहे. वादातील दुसरा पक्ष असलेल्या मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने हा वाद न्यायालयातच सुटू शकेल, अशी भूमिका घेतली आहे.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह