शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राजीव प्रताप रुडी पुन्हा वैमानिकाच्या भूमिकेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 01:40 IST

प्रवासी चकित; २००८ साली घेतला कमर्शिअल पायलटचा परवाना

एस.पी.सिन्हा पाटणा : भाजपचे खासदार राजीव प्रताप रुडी शनिवारी (१ जून) स्वत: विमान चालवित दिल्लीहून पाटण्यात आले. एखाद्या व्यावसायिक वैमानिकाप्रमाणे ते ‘इंडिगो’चे विमान चालवित आले. रुडी यांना ‘कॉकपिट’मधून उतरताना पाहून प्रवाशांना आश्चर्याचा धक्का बसला.रुडी यांनी २००८ साली कमर्शिअल पायलटचा परवाना घेतला आहे. त्यांच्याकडे एअरबस ३२० उडविण्याची खुबी आहे. रुडी हे इंडिगो कंपनीत मानद सह वैमानिक म्हणून काम करतात, असे सांगितले जाते. केंद्रामध्ये अटलबिहारी वाजपेयी सरकार असताना रुडी यांनी नागरी विमान वाहतूकमंत्री म्हणून काम पाहिले होते. तेव्हाही ते विमान चालवित असत. राजीव प्रताप रुडी वैमानिक म्हणून काम करत असत. त्यांना विमान चालविण्याची संधी मिळते, तेव्हा ते सदैव तयार असतात.

पाटणा येथे आल्यानंतर राजीव प्रताप रुडी म्हणाले की, जनतेने जो जनादेश दिला आहे, तो निश्चितपणे विकासासाठी दिला आहे. आमचे सरकार बनले आहे. आम्ही वेगाने विकास करु. जनता दलाच्या (यू)सरकार मध्ये सहभागी न होण्याच्या विषयावर रुडी म्हणाले की, हे प्रकरण उच्चस्तरीय आहे. त्यावर चर्चा झाली आहे. काहीही नाराजी नाही. याबाबत स्पष्टीकरण देण्याची गरजही नाही. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्यांचा पक्ष केंद्रीय मंत्रिमंडळापासून बाजूला राहून बिहारमध्ये विकासाची कामे पुढे नेत राहील, असे सांगितले आहे.

दोघांत कुरबुरी नाहीत

नितीशकुमार यांनी कोणतेही विपरित विधान केलेले नाही,असे सांगून रुडी म्हणाले की, बिहार मध्ये एनडीए एकत्रित सरकार चालवित आहे. जद(यू) हा एनडीएचा मुख्य भाग आहे, आणि राहील. भाजप व जनता दल (यू) यांच्यात काहीही समस्या वा कुरबुरी नाहीत. जनता दलास मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने विरोधक नेते उलटसुलट वक्तव्ये करीत आहेत. मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करीत आहेत, मात्र त्यामुळे काही फरक पडत नाही.