शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राजीव गांधी हत्याकांड! दोषींच्या सुटकेविरोधात केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 21:36 IST

सर्वोच्च न्यायालयाने राजीव गांधी हत्याकांडातील आरोपींची सुटका केली आहे.

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येतील दोषींना सोडण्याच्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारनेसर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. सरकारने नलिनीसह सहा दोषींना शिक्षेतून सूट देण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाकडे पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. 11 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दोषींना सोडण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर नलिनीसह सहा दोषींची तुरुंगातून सुटका करण्यात आली.

राजीव गांधी हत्येप्रकरणी नलिनी आणि पी रविचंद्रन यांनी 30 वर्षांपेक्षा जास्त काळ शिक्षा भोगली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नलिनी, संथन, मुरुगन, रॉबर्ट पायस, जयकुमार आणि रविचंद्रन यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. यापूर्वी 18 मे 2022 रोजी सुप्रीम कोर्टाने या प्रकरणातील आणखी एका दोषी पेरारिवलनला सोडण्याचे आदेश दिले होते. उर्वरित दोषींनीही याच आदेशाचा हवाला देत कोर्टाकडून सुटकेची मागणी केली होती. न्यायालयाने हे मान्य केले की पेरारिवलन प्रकरणातील SC चा निर्णय उर्वरित 6 दोषींनाही लागू होतो.

काँग्रेसने निर्णयाला चुकीचे म्हटले राजीव गांधी हत्येतील दोषींच्या सुटकेला काँग्रेसने दुर्दैवी आणि चुकीचे म्हटले. दोषींना सोडले जाऊ नये असे काँग्रेसने म्हटले होते. ही हत्या माजी पंतप्रधानांशी संबंधित आहे, एखाद्या सामान्य व्यक्तीशी संबंधित नाही, असे काँग्रेसने म्हटले. मात्र, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी दोषींना सोडण्याच्या मुद्द्यावर मला यात कोणतीही अडचण नसल्याचे म्हटले होते. पेरारिवलनच्या सुटकेवर राहुल यांनी हे वक्तव्य केले.

नलिनीला भेटल्यावर प्रियांका रडत होतीसुप्रीम कोर्टातून सुटका झाल्यानंतर दोषींपैकी एक असलेल्या नलिनीने सरकारचे आभार मानले. तमिळनाडूच्या जनतेचेही तिने आभार मानले. काँग्रेस नेत्या आणि राजीव गांधी यांची कन्या प्रियांका गांधीही 2008 मध्ये तुरुंगात नलिनी यांना भेटायला गेल्या होत्या. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नलिनीने सांगितले की, प्रियंका तिच्यासमोर रडत होत्या. नलिनीने राजीव गांधींच्या हत्येशी संबंधित सर्व गोष्टी प्रियांकाला सांगितल्या होत्या.

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधीCentral Governmentकेंद्र सरकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय