शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

महिला IPS चा लैंगिक छळ केल्याप्रकरणी माजी DGP दोषी, न्यायालयाने सुनावली 3 वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 17:14 IST

न्यायालयाने राजेश दास यांना 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

चेन्नई : सहकारी महिला आयपीएस अधिकाऱ्याचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी तामिळनाडूचे माजी पोलीस महासंचालक राजेश दास यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. यासोबतच न्यायालयाने राजेश दास यांना तीन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने फेब्रुवारी 2021 मध्ये एका महिला आयपीएस अधिकाऱ्याने दाखल केलेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणात शिक्षा सुनावली आहे. तसेच, न्यायालयाने राजेश दास यांना 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. याशिवाय, तमिळनाडूच्या विल्लुपुरम येथील न्यायालयाने तक्रार नोंदवण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पोलिसाला 500 रुपयांचा दंडही ठोठावला.

काय आहे प्रकरण?हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, महिला आयपीएस अधिकाऱ्याने फेब्रुवारी 2021 मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती, ज्यात आरोप केला होता की, तत्कालीन मुख्यमंत्री एडप्पाडी के पलानीसामी यांच्या सुरक्षेसाठी ड्युटीवर जात असताना अधिकाऱ्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. या तक्रारीची चौकशी करण्यासाठी राज्याने सहा सदस्यीय समिती स्थापन केली. याशिवाय, तक्रारीनंतर हा 2021 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा मुद्दा बनला होता. ज्यामध्ये अण्णाद्रमुकचा पराभव झाला. राजेश दास यांच्या जागी दक्षता आणि भ्रष्टाचारविरोधी प्रभारी अतिरिक्त महासंचालक जयंत मुरली यांनी नियुक्ती केली आणि त्यांना अनिवार्य वेटिंगमध्ये ठेवण्यात आले.

मद्रास उच्च न्यायालयाने काय म्हटले?तक्रार दाखल केल्यानंतर काही महिन्यांनी मद्रास उच्च न्यायालयाने विल्लुपुरम न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राला आव्हान देणारी राजेश दास यांची याचिका फेटाळून लावली. उच्च न्यायालयाला विल्लुपुरम न्यायालयाच्या आदेशात कोणतीही 'विकृती' आढळली नाही, असे म्हणत न्यायमूर्ती पी वेलमुरुगन यांनी याचिका फेटाळून लावली.  याचबरोबर, उच्च न्यायालयाने यापूर्वीही या घटनेवर ताशेरे ओढले होते. या घटनेला धक्कादायक म्हटले होते आणि तामिळनाडूतील इतर महिला पोलिस अधिकाऱ्यांवर परिणाम होण्याचा इशारा दिला होता. उच्च न्यायालयाच्या निरीक्षणानंतर राज्य सरकारने राजेश दास यांना निलंबित केले.

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूCourtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालय