नवी दिल्ली - काँग्रेसने महाराष्ट्र प्रदेश समितीमधील विविध पदांच्या नियुक्त्या आज जाहीर करण्यात आल्या. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतृत्वात बदल करून प्रदेशाध्यक्षपद बाळासाहेब थोरात यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. तर माध्यम आणि संपर्क समितीच्या प्रमुखपदी राजेंद्र दर्डा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्षपद माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. काँग्रेसने प्रदेश कार्यकारिणीमध्ये केलेल्या विविध समित्यांच्या प्रमुखांची नावे पुढीलप्रमाणे. रणनीती समिती - बाळासाहेब थोरात जाहीरनामा समिती - पृथ्वीराज चव्हाणनिवडणूक समिती - बाळासाहेब थोरातसमन्वय समिती - सुशीलकुमार शिंदे प्रचार समिती - नाना पटोले प्रसिद्धी समिती - रत्नाकर महाजन माध्यम आणि संपर्क समिती - राजेंद्र दर्डा निवडणूक व्यवस्थापन समिती - शरद रणपिसे
काँग्रेसच्या माध्यम आणि संपर्क समितीच्या प्रमुखपदी राजेंद्र दर्डा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 22:41 IST