शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
4
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
5
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
6
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
7
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
8
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
9
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
10
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
11
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
12
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
13
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
14
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
15
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
16
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
17
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!
18
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
19
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
20
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग

VIDEO: "सरकार पाडण्याचे प्रयत्न थांबवा; पंतप्रधान मोदीजी, हा तमाशा बंद करा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 18:49 IST

राजस्थानात सत्ता संघर्ष सुरू; भाजपाकडून आमदार खरेदीचे प्रयत्न सुरू असल्याचा मुख्यमंत्री गेहलोत यांचा आरोप

जयपूर: राजस्थानमधील सत्ता संघर्ष अद्यापही सुरूच आहे. या सत्ता संघर्षात दररोज नव्या घटना घडत असल्याचं समोर येत आहे. सुरुवातीला मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट असा संघर्ष सुरू झाला. त्यानंतर तो राजभवन, उच्च न्यायालयापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयातही पोहोचला. या प्रकरणात मुख्यमंत्री गेहलोत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संपर्क साधला. मात्र यानंतरही सत्ता संघर्ष थांबलेला नाही. त्यामुळे आता गेहलोत यांनी पुन्हा एकदा मोदींना आवाहन केलं. राज्यात सुरू असलेला तमाशा मोदींनी थांबवावा, असं गेहलोत म्हणाले आहेत.गेहलोत यांच्या गटातल्या आमदारांना जयपूरहून जसलमेरला पाठवण्यात आलं. मुख्यमंत्री अशोक गेहलोतदेखील जसलमेरला पोहोचले. काँग्रेसचं सरकार पाडण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी घोडेबाजार केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. मोदींनी राज्यात सुरू असलेला तमाशा बंद करावा, असं आवाहन त्यांनी केलं. 'भाजपाच्या प्रतिनिधींकडून सुरू असलेला आमदार खरेदीचं कारस्थान अतिशय मोठं आहे. ते इथे कर्नाटक, मध्य प्रदेशची पुनरावृत्ती करू पाहत आहेत. संपूर्ण गृह मंत्रालय याचसाठी काम करत आहे,' असा आरोप गेहलोत यांनी केला.आमदारांसह जसलमेरला पोहोचलेल्या गेहलोत यांनी भाजपावर शरसंधान साधलं. 'आम्ही कोणाचीही फिकीर करत नाही. आम्ही लोकशाहीची फिकीर करतो, असं ते म्हणतात. आमचा संघर्ष कोणाच्याही विरोधात नाही. तो केवळ विचारधारेविरोधात आहे, असं ती मंडळा म्हणतात. पण लोकनियुक्त सरकार पाडण्याला विचारांची लढाई म्हणत नाहीत. आमचा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नाही. तो केवळ लोकशाही वाचवण्यासाठी आहे,' अशी टीका गेहलोत यांनी केली.देशातल्या जनतेनं नरेंद्र मोदींना दुसऱ्यांदा पंतप्रधान होण्याची संधी दिली. ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांनी राजस्थानात सुरू असलेला तमाशा बंद करावा, असं आवाहन गेहलोत यांनी केलं. 'पंतप्रधान म्हणून मोदींनी राजस्थानात सुरू असलेला तमाशा बंद करावा. घोडेबाजाराचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. विधानसभा अधिवेशनाची घोषणा होताच त्यांनी रेट आणखी वाढवला आहे,' असं गेहलोत म्हणाले.

टॅग्स :Rajasthanराजस्थानNarendra Modiनरेंद्र मोदीAshok Gahlotअशोक गहलोत