शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक घटना! सरकारी रुग्णालयात महिला रुग्णाच्या डोळ्यांचा उंदराने घेतला चावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 16:57 IST

'खाद्यपदार्थ पडलेले असतात, म्हणून उंदीर येतात'; रुग्णालय व्यवस्थापनाचे बेजबाबदार वक्तव्य.

कोटा: राजस्थानमधील सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांसोबत अनुचित प्रकार घडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. असाच एक प्रकार कोटाच्या सरकारी रुग्णालयातून समोर आला आहे. राजस्थानमधीलसर्वात मोठ्या रुग्णालयांपैकी एक असलेल्या कोटाच्या एमबीएसमध्ये एका महिला रुग्णाचा डोळा उंदराने खाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

रुग्णालयाचे बेजबाबदार वक्तव्यकोटाच्या एमबीएसमध्ये घडलेल्या या घटनेमुळे रुग्णालयात एकच खळबळ उडाली. ही घटना घडल्यानंतर घाईघाईत डॉक्टरांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी महिलेच्या डोळ्यांना ड्रेसिंग केली. धक्कादायक बाब म्हणजे, या घटनेबाबत रुग्णालय व्यवस्थापनेने एक बेजबाबदार वक्तव्य केले आहे. रुग्णांजवळ खाद्यपदार्थ पडलेले असतात, त्यामुळे तिथे उंदीर येतात, असं रुग्णालयाने म्हटलं आहे.

महिलेला पक्षाघाताचा त्रास मिळालेल्या माहितीनुसार, जीबीएस सिंड्रोमने ग्रस्त रुपमती (30) सुमारे 45 दिवसांपासून एमबीएस रुग्णालयात दाखल आहेत. महिलेचा पती देवेंद्र सिंह यांनी सांगितले की, त्याने आपल्या पत्नीला अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना न्यूरो आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. मान हलवता येत नसल्यामुळे सुमारे 42 दिवस त्या व्हेंटिलेटरवर होत्या आणि दोन दिवसांपूर्वी महिलेला येथे हलवण्यात आले होते.

डोळ्यावर जखमादेवेंद्रने सांगितले की, रात्री पत्नीच्या चेहऱ्यावर कपडा दिसला आणि ती रडू लागली. डोळ्यावरचा कपडा काढल्यानंतर चेहऱ्यावर रक्त दिसले. मी तात्काळ कर्मचारी व डॉक्टरांना कळवले. डॉक्टरांनी सांगितले की कुठला तरी कीटक चावला असेल. पण, डोळ्यावरची जखम मोठी असल्याने माझा डॉक्टरांवर विश्वास बसत नव्हता. पापणीचे दोन तुकडे झाले होते. कीटक चावल्यामुळे असे होत नाही. डॉक्टरांनी रात्री उपचार केले पण, सकाळी जखम उंदीर चावल्याने झाली असावी, असे डॉक्टर म्हणाले.

टॅग्स :Rajasthanराजस्थानkota-pcकोटाhospitalहॉस्पिटल