शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ईदच्या दिवशी अनेक ठिकाणी गोंधळ; जोधपूरमध्ये 12 तासांत 3 वेळा हिंसाचार; अनंतनागमध्ये दगडफेक, खरगोनमध्ये कर्फ्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 13:36 IST

ईदच्या नमाजनंतर, आंदोलकांनी संरक्षण दलाच्या जवानांवर दगडफेक केली. मध्य प्रदेशातील खरगोन येथेही दंगलीच्या 22 दिवसांनंतर, कर्फ्यूमध्येच सन साजरा केला जात आहे. येथे तब्बल 1300 पोलीस कर्मच्याऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जोधपूर येथे लाउडस्पीकरच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वाद अद्यापही थांबल्याचे दिसत नाही. आता येथे पुन्हा एकदा दोन गट समोरासमोर आले आहेत. ईदच्या नमाजदरम्यान हा वाद पेटल्याचे बोलले जात आहे. यावेळी पोलिसांना येथे पुन्हा एकदा लाठीचार्ज करावा लागला आणि आश्रूधुराचे गोळेही सोडावे लागले. याशिवाय, मंगळवारी अनंतनाग येथेही मशिदीबाहेर दगडफेक झाली. ईदच्या नमाजनंतर, आंदोलकांनी संरक्षण दलाच्या जवानांवर दगडफेक केली. मध्य प्रदेशातील खरगोन येथेही दंगलीच्या 22 दिवसांनंतर, कर्फ्यूमध्येच सन साजरा केला जात आहे. येथे तब्बल 1300 पोलीस कर्मच्याऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

डझनावर वाहनांचे नुकसान -सांगण्यात येते, की येथे पुन्हा एकदा पोलिसांनी फ्लॅग मार्च सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार, आज ईदच्या नमाज वेळी येथे मोठी गर्दी होती. याच वेळी वाद पेटला. धुडगूस घालणाऱ्या  लोकांनी जवळपास डझनावर वाहनांचे नुकसान केले आहे. या वाहनांच्या काचा फुटल्या आहेत. याशिवाय पोलिसांच्याही चार वाहनांचे नुकसान झाले आहे. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे. यातच केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, भाजप आमदार सूर्यकांता व्यास यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी येथे ठिय्या दिला आहे.

यापूर्वी, सोमवारी रात्री उशिरा जोधपूर येथील जालोरी गेट चौकात दोन्ही गटात लाऊडस्पीकर आणि झेंडे हटविण्याच्या मुद्द्यावरून दगडफेक झाली होती. आताही त्याच ठिकाणी पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वृत्तानुसार, येथे एका समुदायातील लोकांनी, जालोरी भागातील, स्वातंत्र्यसैनिक बाल मुकुंद बिस्सा यांच्या पुतळ्यावरील झेंड्यावर आक्षेप घेतला. तसेच हा झेंडा आणि ईदनिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरविरोधात घोषणाबाजी केली.

याच बरोबर या आंदोलकांनी हा झेंडा आणि बॅनर काढून टाकले. यामुळे वाद वाढला. यानंतर दुसऱ्या समाजाचे लोक नाराज झाले आणि नंतर दोन्ही गटांत दगडफेक सुरू झाली. यानंतर, जोधपूरचे जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ता यांनी शहरातील इंटरनेट सेवा मंगळवारी एक वाजल्यापासून अनिश्चित काळासाठी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानMadhya Pradeshमध्य प्रदेश