शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

माजी मुख्यमंत्र्यांना बंगला, गाडी, स्टाफ देणारा कायदा राजस्थान उच्च न्यायालयाकडून रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 07:02 IST

राजस्थान विधिमंडळाने राजस्थान मिनिस्टर्स सॅलरीज अ‍ॅक्टमध्ये दुरुस्ती केली.

खुशालचंद बाहेती नवी दिल्ली : माजी मुख्यमंत्र्यांना तहहयात सरकारी बंगला, वाहन, फोन व १० कर्मचारी देण्याची तरतूद राजस्थान सरकारने केली होती. मात्र, राजस्थान उच्च न्यायालयाने ती घटनाबाह्यठरवून रद्द केली. यापूर्वी उत्तर प्रदेश सरकारच्या मंत्रिमंडळाने अशा तरतुदींना दिलेली मंजुरी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राजस्थान सरकारने एक पाऊल पुढे जाऊन त्याला कायद्याचे स्वरूप दिले होते; परंतु राजस्थान उच्च न्यायालयाने हेही रद्द ठरवले आहे.

राजस्थान विधिमंडळाने राजस्थान मिनिस्टर्स सॅलरीज अ‍ॅक्टमध्ये दुरुस्ती केली. यात ७ ब ब व ११ ही दोन नवीन कलमे समाविष्ट केली. या कलमांप्रमाणे सर्व माजी मुख्यमंत्र्यांना आयुष्यभर सरकारी बंगला, बंगल्यातील वीज, पाणी, फोन या सुविधा, कुटुंबियांसाठी वाहन व १० कर्मचारी सरकारी खर्चाने देण्याची तरतूद केली. यासाठी मुख्यमंत्री कितीही काळासाठी असतील तरी त्यांना पात्र ठरवण्यात आले.या तरतुदीला उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले होते. ही याचिका मान्य करताना खंडपीठाने अशा प्रकारच्या सुविधा सरकारी पैशाने देणे म्हणजे सरकारी मालमत्तेचा अपव्यय असल्याचे म्हटले आहे.सरकारतर्फे बाजू मांडताना, विधिमंडळाला असा कायदा करण्याचा अधिकार आहे व न्यायालय यात हस्तक्षेप करू शकत नाही, असा मुद्दा मांडण्यात आला. मात्र, तो फेटाळताना ही तरतूद घटनेच्या खंड १४ (समानतेचा अधिकार)चा भंग असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.उच्च न्यायालयाने नोंदविलेली निरीक्षणे1 उत्कृष्ट अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेतदेखील निवृत्त राष्टÑाध्यक्षांना फक्त पेन्शन आणि आरोग्य विमा मिळतो. माजी राष्टÑाध्यक्ष कायदा १९५८ प्रमाणे त्यांनाही घर, वीज, फोन मोफत मिळत नाही.2 सरकारी बंगले पदावरील व्यक्तीसाठी आहेत.3 अशा प्रकारच्या मोफत घर व सुविधेमुळे शासनाच्या तिजोरीवर अनावश्यक बोजा येतो. राजस्थान सरकार आर्थिक मागासलेले आहे. त्यांना हे परवडणारे नाही.4 पद सोडल्यानंतर मुख्यमंत्री हे सामान्य नागरिक राहतात. त्यांना स्वतंत्र व विशेष सवलती देणे हे घटनात्मक दृष्ट्या अवैध आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयChief Ministerमुख्यमंत्रीcarकारCourtन्यायालय