जोधपूर : राजस्थान उच्च न्यायालयाने मंगळवारी २०१३ च्या बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामला ३१ मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला.एका आठवड्यापूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने आसारामला बलात्काराच्या दुसऱ्या प्रकरणात ३१ मार्चपर्यंत जामीन मंजूर केला. आसाराम अनेक आजारांनी ग्रस्त आहे. न्यायमूर्ती दिनेश मेहता आणि न्यायमूर्ती विनीत कुमार माथूर यांच्या खंडपीठाने आसारामला अंतरिम जामीन मंजूर केला. या याचिकेचे स्वरूप सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेसारखे होते, असे खंडपीठाने सांगितले.
आसारामला ३१ मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 05:43 IST