शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी रात्री जेवून झोपल्या, सकाळी उठल्याच नाहीत; सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 09:22 IST

Preeti Kumari : राजस्थानचे आरोग्यमंत्री गजेंद्र सिंह खींवसर यांच्या पत्नी प्रीती कुमारी यांचं गुरुवारी सकाळी निधन झालं आहे.

राजस्थानचे आरोग्यमंत्री गजेंद्र सिंह खींवसर यांच्या पत्नी प्रीती कुमारी यांचं गुरुवारी सकाळी निधन झालं आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री जेवण करून त्या झोपण्यासाठी गेल्या होत्या. सकाळी उशिरापर्यंत त्या न उठल्याने कुटुंबीयांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांना तातडीने उपचारासाठी जयपूरच्या दुर्लभजी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रीती कुमारी यांना सायलेंट हार्ट अटॅक आला होता, ज्यामुळे त्यांचा झोपेतच मृत्यू झाला. सकाळी एक मेडिकल टीम मंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचली आणि त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. परंतु त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

गजेंद्र सिंह खींवसर आणि प्रीती कुमारी यांचं फेब्रुवारी १९८२ मध्ये लग्न झालं होतं. त्यांचा मुलगा धनंजय सिंह खींवसर हे जोधपूर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. तसेच त्यांना एक मुलगी देखील आहे. कुटुंबातील जवळच्या लोकांनी प्रीती कुमारी अतिशय सौम्य आणि कुटुंबाभिमुख स्वभावाच्या होत्या असं सांगितलं आहे.

गजेंद्र सिंह खींवसर हे मंत्री आहेत. गुरुवारी त्यांना बिकानेरमध्ये अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहायचे होतं, परंतु त्यांच्या पत्नीच्या निधनामुळे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. प्रीती कुमारी यांच्या आकस्मिक निधनामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. अनेक नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानHeart Attackहृदयविकाराचा झटका